Paddy Crop Damage : भोर तालुक्यात पावसात नाचणी, वरईचे नुकसान

Unseasonal rain : कुडली खुर्द येथील १० तर कुडली बुद्रुक येथील २० शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन गुरुवारी पाहणी करून पंचनामे करण्यात आले आहेत. आता शेतकऱ्यांकडून तातडीने नुकसान भरपाई मिळण्याची मागणी होत आहे.
Paddy crop Damage
Paddy crop Damage Agrowon

Pune News : तालुक्यातील नीरा देवघर धरण रिंग रोडवरील शेवटच्या टोकावर असलेल्या दुर्गम डोंगरी भागातील कुडली बुद्रुक आणि खुर्द येथील कापणी केलेल्या रचून ठेवलेल्या नाचणी व वरई पिकांचे मॉन्सूनोत्तर पावसाने नुकसान झाले आहे. दुर्गम भागातील नुकसानीची पाहणी आणि पंचनामे कृषी सहायक योगेश अंभोरे यांनी गुरुवारी (ता. ३०) केले.

कुडली खुर्द येथील १० तर कुडली बुद्रुक येथील २० शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन गुरुवारी पाहणी करून पंचनामे करण्यात आले आहेत. आता शेतकऱ्यांकडून तातडीने नुकसान भरपाई मिळण्याची मागणी होत आहे.

पावसात भिजल्यामुळे नाचणी व वरईचा दाणा काळा पडण्याची भीती निर्माण झाली आहे. तर काही दाण्यांना पुन्हा कोंब फुटल्याने नुकसान झाल्‍याचे शेतकरी गेणबा कंक व सखाराम कंक यांनी सांगितले.

Paddy crop Damage
Crop Damage : विदर्भात दोन लाख हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान

हिरडस मावळात भात पिकांबरोबरच नाचणी व वरईचे पीक घेतले जाते. या पिकातून मिळालेल्या उत्पादनातून या भागातील शेतकऱ्यांची वर्षभराची उपजीविका अवलंबून असते. परंतु निसर्गाच्या लहरीपणाचा या भागातील शेतकऱ्यांना नेहमीच सामना करावा लागत आहे.

Paddy crop Damage
Crop Damage : चार लाख हेक्टरहून अधिकपिकांना पावसाचा फटका

दोन वर्षांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे या भागातील डोंगराचा भाग वाहून आल्याने मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले होते. त्यातून शेतकरी सावरत असतानाच पावसामुळे झालेल्या नुकसानीने शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे.

भोर तालुक्यातील दुर्गम आणि डोंगरी भागात शेतकऱ्यांचे भाताबरोबरच नाचणी व वरईचे पीक घेतात. नुकत्याच झालेल्या मॉन्सूनोत्तर पावसात भिजल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तरी या नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाने त्वरित नुकसान भरपाई द्यावी.
- नामदेव पोळ, सरपंच, शिरवली हिमा, कुडली
भोर तालुक्यातील नजर अंदाजित पाहणी केली आहे. ३१ गावांतून ३५२ शेतकऱ्यांचे ६५.७२ हेक्टर नुकसान झाले आहे. सर्वेक्षणानुसार अहवाल शासनाला कळविला आहे.
- देवेंद्र ढगे, तालुका कृषी अधिकारी, भोर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com