Student Mental Health Crisis  Agrowon
ॲग्रो विशेष

Student Self Slaughter: विद्यार्थी आत्महत्या : चिंता अन् चिंतन

Suicide Prevention: ‘नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्यूरो’च्या अहवालानुसार विद्यार्थी आत्महत्येचे वाढते प्रमाण चिंता वाढविणारे आणि चिंतन करायला भाग पाडणारे असेच आहे. या अहवालात असे नमूद केलेले आहे, की महाराष्ट्र, तमिळनाडू, मध्य प्रदेश या राज्यांत विद्यार्थ्यांच्या आत्महत्या सर्वाधिक आहेत.

Team Agrowon

Student Stress Factor: हे खरे, की आज शिक्षणाचा ढाचा मानसिक पातळीवर समजून घ्यावा, हा सांप्रत काळाचा आवाज आहे. कारण एकंदरीत विद्यार्थी नानाविध तणावांखालीच असतो. जीवघेण्या स्पर्धा, भवितव्याची साशंक हमी आणि त्यातून मूळ धरणारा भयगंड, पालकांच्या वाढत्या अपेक्षा, अभ्यासाचे वाढते ओझे, अनाठायी महत्त्वाकांक्षा, महागडे शिक्षण, वय वाढते आहे, तरीही संधी दिसत नाहीत. पुढली दिशा धूसर दिसते आहे, असे बहुपेडी भय विद्यार्थ्यांसमोर दिनानुदिन वाढलेले दिसून येते. यातूनच मग ‘मन चिंती ते वैरी न चिंती’ अशा अवस्थेप्रत विद्यार्थीमने ओढली जातात. मानसशास्त्रीय स्तरावर हे मानस अधिक बारकाईने समजून घेण्याची अवश्य निकड आहे.

आज एकूण समाजात आरोग्याचाही गुंता वाढलेला आहे. मन न थकवणारी उसंत हल्ली हद्दपार झालेली आहे. शरीरही थकते याचा जणू विसर पडत चालला आहे. घोका आणि ओका यात आपल्या परीक्षाही अडकत तर नाहीत ना आणि म्हणून विद्यार्थ्यांची मने वाचनच आपण विसरत चाललो आहोत का? हेही जरा बारकाईने समजून घ्यावयाची आवश्यकता आहे. ‘‘शेतकऱ्यांपेक्षा विद्यार्थ्यांच्या आत्महत्या अधिक...’’ असे वृत्त दरम्यान प्रसिद्ध झालेले आहे.(सकाळ, ३० ऑगस्ट २४)

नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्यूरो अर्थात एन.सी.आर.बी.च्या अहवालानुसार विद्यार्थी आत्महत्येचे वाढते प्रमाण चिंता वाढविणारे आणि चिंतन करायला भाग पाडणारे असेच आहे. या अहवालात असे नमूद केलेले आहे, की महाराष्ट्र, तमिळनाडू, मध्य प्रदेश या राज्यांत विद्यार्थ्यांच्या आत्महत्या सर्वाधिक आहेत. त्यात पुढे असेही म्हटलेले आहे : लोकसंख्या आणि आकारमानाच्या दृष्टीने मोठा असणाऱ्या उत्तर प्रदेशातील विद्यार्थी आत्महत्यांचे प्रमाण हे सर्वाधिक आहे.

सावध ऐका पुढल्या हाका

या खोल वेदनेवर औषध शोधले पाहिजेत. हे जीवन सुंदर आहे... अशी शिक्षणाची नवी प्रणाली तरुणाईत रुजवली जायला हवी. यंत्रवत समजून अभ्यास करण्याची पद्धतही बदलली पाहिजेत. युवाशक्ती ही अश्‍वशक्ती नव्हे आणि म्हणून त्यांना एखादे ईप्सित गाठण्यासाठी धावाधाव करायला लावणाऱ्या वृत्तीलाही मुरड घातली जायला हवी. कारण हल्ली संस्कार हरवून आपण पालकही शिक्षण एकेशिक्षण आणि नोकरी एकेनोकरी, असा जणू ससेमिराच मुलांच्या मागे लावून दिला आहे. इथेही थोडे पाणी मुरते आहे, हा विचारही अलक्षित व्हायला नको. म्हणून आत्महत्या करण्याचा काळा विचार येतो कुठून? हे मूळ जाणायला हवे. सारे काही आपल्या लेकरांकडे बोट दाखवून चिंताक्रांत तसेच चिंतन करणाऱ्या या विषयाचे निरसन असे हे सहजी होणारे नाही.

आकडे काय सांगतात?

सन २०२२ मध्ये राज्यनिहाय आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्यांची जी आकडेवारी पुढे आली ती अक्षरशः अस्वस्थ करणारी आहे. शिक्षणव्यवस्थेतील विद्यार्थी आत्महत्यांचे

प्रमाण महाराष्ट्र - १७६४, तमिळनाडू - १४१६, मध्य प्रदेश - १३४०, उत्तर प्रदेश - १०६०, झारखंड - ८२४ हे सारे आकडे सामाजिक, शैक्षणिक आणि वर्तमानकालीनदृष्ट्या भयंकर तसेच पालकांची चिंता वर्धित करणारे म्हटले पाहिजेत.

या जगण्यावर शतदा प्रेम करावे

यासंदर्भात, समाजघटक म्हणून आपण सर्वांनीच युवा वय - विचार, त्यांचा मन - विचार आणि आहार - विहार विचार अधिक सूक्ष्मपणे करण्याची निकड आहे. या जगण्यावर शतदा प्रेम करावे, या कविवचनानुसार जीवनायुष्य ही फार थोर गोष्ट आहे, याचा सखोल विचार पालकांनी करत तो पाल्यांच्या गळी उतरवण्याची आवश्यकता आहे. भौतिक सुखांचे शोध महत्त्वाचेच पण म्हणून केवळ त्यांच्याच मागे धावण्याची गरज अंतिम मानावयाचे काहीच कारण नाही. हे सगळे सबुरीने घेतले तरी कुटुंबातील या वाढत्या वेदनेवर औषध शोधले जाऊ शकते.

- प्रा. डॉ. केशव सखाराम देशमुख

(लेखक बोलीभाषा अभ्यासक असून महाराष्ट्र शासनाच्या भाषा सल्लागार समितीचे तज्ज्ञ सदस्य आहेत.)

९४२२७२१६३१

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Loan Waiver GR: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ चा शासन निर्णय जारी; शेतकऱ्यांची दोन लाखांपर्यंत कर्जमाफी

Ujani Dam Water: पाऊस लांबण्याची शक्यता; उजनीतील पाणी केवळ पिण्यासाठीच राखीव

Banana Cultivation: केळीच्या दर्जेदार उत्पादनासाठी जमिनीची सुपीकता टिकवणे गरजेचे : शरद विसपुते

Kharif Tayari: दिंडोरी तालुक्यात कृषी विभागाकडून खरिपाची तयारी

Yeola Water Scarcity: येवल्यात टंचाईची झळ तीव्र; ५५ टँकर फेऱ्यांवर पाणीपुरवठा

SCROLL FOR NEXT