Student News Channel : शालेय विद्यार्थांचा ‘माझा गाव-माझी बातमी’ चॅनेल

Success Story : ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थांना लहानपणापासून पत्रकारिता आणि सर्जनशील विचारसरणीचा अनुभव मिळण्यासाठी गोऱ्हे बुद्रुक (ता. हवेली) गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील उपक्रमशील शिक्षक रजनीकांत मेंढे यांनी चार वर्षांपूर्वी ‘माझा गाव- माझी बातमी’ हा उपक्रम राबविण्यास सुरुवात केली.
Student
StudentAgrowon
Published on
Updated on

Pune News : ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थांना लहानपणापासून पत्रकारिता आणि सर्जनशील विचारसरणीचा अनुभव मिळण्यासाठी गोऱ्हे बुद्रुक (ता. हवेली) गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील उपक्रमशील शिक्षक रजनीकांत मेंढे यांनी चार वर्षांपूर्वी ‘माझा गाव- माझी बातमी’ हा उपक्रम राबविण्यास सुरुवात केली.

शालेय घडामोडी, गावातील चांगल्या घटना आणि विशेष उपक्रमांवर आधारित बातमी तयार करून गावकऱ्यांपर्यंत यू-ट्यूब चॅनेलच्या माध्यमातून पोहोचविणे हा मुख्य उद्देश आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे संवादकौशल्य आणि विश्‍लेषणात्मक दृष्टिकोनात चांगला बदल दिसून आला आहे.

Student
MPSC Success : शेतकऱ्याच्या मुलीने सर केला लोकसेवा आयोगाचा गड

...अशी तयार होते बातमी

उपक्रमाबाबत रजनीकांत मेंढे म्हणाले, की विद्यार्थी गावशिवार किंवा शाळेच्या परिसरात घडणाऱ्या चांगल्या घटनांची माहिती गोळा करतात. तज्ज्ञ तसेच लेखकांच्या मुलाखती विद्यार्थी घेतात. जमा झालेली माहिती संकलित करून विद्यार्थी बातमी तयार करतात. बातमी अधिक परिणामकारक बनविण्यासाठी शाळेच्या तुरीय लॅबमध्ये व्हिडिओ तयार केला जातो.

लॅबमध्ये विविध सॉफ्टवेअर आणि साधनांचा वापर करून बातमी संपादित केली जाते. त्यानंतर हा बातमीवजा व्हिडिओ शाळेच्या अधिकृत यू-ट्यूब चॅनेलवर प्रसारित केला जातो. या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग आहे. बातमी लेखन, कॅमेरा हाताळणी, व्हिडिओ संपादन तसेच सादरीकरण हे विद्यार्थी स्वतःच करतात. यामुळे त्यांचा आत्मविश्‍वास वाढतो, त्यांना व्यक्त होण्याची संधी मिळते. याबाबत त्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.

Student
Agriculture Success Story : शेती व पशुपालनास थेट विक्रीची जोड देऊन अर्थकारण सशक्त केले

शाळेतील तुरीय लॅब

अमेरिकेतील संगणक तज्ज्ञ अजय वालगुडे यांच्या मदतीने शाळेत विद्यार्थांना विज्ञान प्रयोग समजण्यासाठी ‘तुरीय लॅब’ उभारण्यात आली. या ठिकाणी व्हिडिओ, ऑडिओ लॅब आहे. येथे विद्यार्थी आपले विचार मांडण्याचा, अनुभव सांगण्याचा आणि कथा तयार करण्याचा सराव करतात.

पॉडकास्ट तयार करणे हा ऑडिओ लॅबचा मुख्य उद्देश आहे. विद्यार्थी लहान विषयांवर पॉडकास्ट तयार करून ते ग्रामस्थांना पाठवतात. सोशल मीडियावर या उपक्रमास चांगला प्रतिसाद मिळत आहे. येत्या काळात विद्यार्थांसाठी वेब डेव्हलपमेंट, डिजिटल मार्केटिंग आणि अन्य कौशल्यवर्धक उपक्रम सुरू करण्याचा रजनीकांत मेंढे यांचा प्रयत्न आहे.

‘माझा गाव- माझी बातमी’ या उपक्रमामुळे मुलांना माहिती तंत्रज्ञानाचा योग्य उपयोग कसा करायचा, माहिती कशी सादर करायची आणि सामाजिक प्रश्‍नांवर चर्चा कशी घडवायची हे शिकायला मिळते. विद्यार्थांनी तयार केलेल्या बातम्या गावाच्या प्रगतीसाठी उपयोगी ठरत आहेत.

रजनीकांत मेंढे, ८६६८७८३३४८

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com