MSRTC Ticket Hike Cancelled Agrowon
ॲग्रो विशेष

ST Fare Hike Issue : एसटीची हंगामी भाडेवाढ रद्द; ५५ कोटींची सरकारकडे मागणी

MSRTC Ticket Hike Cancelled : विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महायुती सरकारने यंदाच्या दिवाळीत एसटीची हंगामी भाडेवाढ रद्द केली आहे. यामुळे महामंडळाला सुमारे १०० कोटी रुपयांचा कमी महसूल मिळणार आहे.

Team Agrowon

Mumbai News : विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महायुती सरकारने यंदाच्या दिवाळीत एसटीची हंगामी भाडेवाढ रद्द केली आहे. यामुळे महामंडळाला सुमारे १०० कोटी रुपयांचा कमी महसूल मिळणार आहे. तर, एसटी कर्चमाऱ्यांना दिवाळी बोनस देण्यासाठी ५५ कोटी रुपयांच्या मागणीचा प्रस्ताव सरकारकडे पाठवला आहे.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील कर्मचारी व अधिकाऱ्यांना दिवाळी भेट रक्कम देण्यासाठी निधी कमी पडतो. पण इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांचीही दिवाळी गोड व्हावी यासाठी दिवाळीसाठी मिळणारी रक्कम तत्कालीन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी सुरू केली. यासाठी हंगामी भाडेवाढ करण्याची योजना अंमलात आणली गेली व त्यातून कर्मचाऱ्यांना दिवाळी रक्कम भेटस्वरूपात देण्यात येत होती.

यंदा मात्र आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हंगामी भाडेवाढ रद्द करून प्रवाशांना दिलासा दिला आहे. यामुळे महामंडळाचे अंदाजे १०० कोटी रुपये नुकसान होणार असून ही रक्कम शासनाने एसटीला दिली पाहिजे, अशी मागणी आता महामंडळाने केली आहे. दिवाळी सण तोंडावर आला आहे. दिवाळी आनंदात साजरी करता यावी यासाठी सरकारने तत्काळ निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केली आहे.

सध्या आणि खास करून सणासुदीच्या दिवसांत महामंडळाच्या बस प्रवाशांनी भरून जात असल्या, तरी प्रत्यक्ष एसटीच्या तिजोरीत अर्ध्यापेक्षाही कमी रक्कम पडते. यातून दैनंदिन खर्च भागविला जातो. प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या सवलत मूल्याची प्रतिपूर्ती सरकारकडून दिली जाते. परंतु मागील काही महिन्यांपासून सवलत मूल्याच्या प्रतिपूर्तीची पूर्ण रक्कम दिली जात नाही. त्या मुळे कर्मचाऱ्यांची देणी थकली आहेत.

फक्त पगार होईल एवढीच रक्कम महामंडळाला दरमहा शासनाकडून दिली जात आहे. आता दिवाळी बोनस देण्यासाठी महामंडळाला शासनाकडे हात पसरावा लागला आहे. यासाठी ५५ कोटी रुपयांच्या रक्कमेच्या मागणीचा महामंडळाने शासनाकडे प्रस्ताव पाठविला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Godavari Irrigation Reform: थकबाकी वसुली, स्वायत्तता अजेंड्यावर

Well Approval Irregularities: पंचायत समिती कर्मचाऱ्यांनी दिली परस्पर ३७ विहिरींना मंजुरी

Grape Vineyard Destroyed: उभ्या द्राक्ष बागेवर माथेफिरूकडून कुऱ्हाड

Transport Business Issue: ट्रान्सपोर्ट व्यवसाय ‘व्हेंटिलेटर’वर

Tree Cutting Ban: नाशिकमध्ये वृक्षतोडीला २८ एप्रिलपर्यंत स्थगिती

SCROLL FOR NEXT