Orchard  Agrowon
ॲग्रो विशेष

Drought Condition : उन्हात बागा जगविण्याची धडपड

Water Shortage : दुष्काळी स्थितीमुळे करमाळा तालुक्यात जमिनीतील पाणी पातळी दिवसेंदिवस खोलवर चालली आहे. अशा स्थितीत फळबागा जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे.

Team Agrowon

Solapur News : दुष्काळी स्थितीमुळे करमाळा तालुक्यात जमिनीतील पाणी पातळी दिवसेंदिवस खोलवर चालली आहे. विहिरी कोरड्या पडल्या असून, बोअरवेल अर्धाच तास चालत आहेत, अशा स्थितीत फळबागा जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असून, नवीन बोअरवेल घेतले जात आहेत. मात्र बोअरवेलमधून नुसता धुरळा उडत असल्याने शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे.

करमाळ्यातील पोथरे आणि परिसरात सध्या अपुऱ्या पर्जन्यमानामुळे विहिरी कोरड्या पडल्या असून, जमिनीतील पाणीपातळी साडेतीनशे ते चारशे फुटांपेक्षाही खोल गेली आहे. सध्या बोअरमधून कुठे अर्धा तास, तर कुठे एक तास पाणी निघत आहे. सध्या आहे या तुटपुंजा पाण्यावरच ठिबक सिंचनाद्वारे पाणी दिल्याने या भागातील डाळिंब, लिंबू, सीताफळ, पेरू आदी फळबागा तग धरून आहेत.

शिवाय जनावरांच्या व सांडपाण्याचा प्रश्‍नही गंभीर झाला आहे. त्यामुळे शेतकरी नवीन बोअरवेल घेण्याकडे वळाले आहेत. मात्र चारशेफूट बोअरवेल गेला, तरी नुसता धुरळा निघत असल्याने शेतकऱ्यांची मोठी निराशा होत आहे. एका बोअरवेलसाठी ३५ ते ४० हजार खर्च होत आहे. शिवाय मोटर वायर यासाठी ५० हजार खर्च होत आहे. एवढा खर्च होऊनही पाणी मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडत आहे, अशा स्थितीत ही बळिराजा आपल्या फळबागा जगवण्यासाठी जिवाची रान करत आहे.

फळबागा जळाल्या तर लाखो रुपयांचे नुकसान होऊन पुन्हा फळबागा तयार करण्यासाठी तीन-चार वर्षे जातात. त्यामुळे पाण्याच्या आशेपोटी बोअरवेल घ्यावेच लागतात. पण पाणी लागत नसल्याने खर्च वाया जात आहे.
संदीप खटके, शेतकरी, पोथरे
अडीच एकर डाळिंब पाण्याअभावी ते जळू लागले आहे. बोअरवेल घेऊन ये पाणी लागले नाही. आणखी अडीच महिने उन्हाळा राहिलेला आहे. त्यामुळे फळबागा जगणे कठीण झाले आहे.
सचिन नलवडे, शेतकरी, बाळेवाडी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Devendra Fadnavis BJP Victory: भाकीत खरं ठरलं! भाजपचा नवा रेकॉर्ड, किती जागा जिंकल्या?; फडणवीसांनी सांगितली आकडेवारी

Orange Crop Insurance: संत्रा उत्पादकांना १७ कोटींचा विमा परतावा

Livestock Competition: लिंबोटीचा लालकंधारी वळू ठरला चॅम्पियन

Agriculture Crisis: अनियमित विजेमुळे रब्बी पिके धोक्यात

Vijay Wadettiwar: 'चंद्रपूर में टायगर अभी जिंदा हैं'; काँग्रेसच्या ८ नगराध्यक्षांच्या विजयानंतर वडेट्टीवारांची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT