Honey Bee Agrowon
ॲग्रो विशेष

Honey Bee : मधमाश्‍यांच्या वसाहतींची रचना

Team Agrowon

राहुल साळवे, डॉ. पुरुषोत्तम नेहरकर

Species of Bees : मधमाश्या या समूह करून राहतात. मधमाश्यांच्या एका वसाहतीमध्ये एक राणीमाशी, काही नर माश्‍या तर अनेक म्हणजेच सुमारे दहा हजार कामकरी माश्‍या असतात. या संपूर्ण घटकांची मिळून एक वसाहत तयार होते. या वसाहतीमध्ये राणी, नर व कामकरी माश्‍यांना प्रत्येकाचे काम नेमलेले असते.

राणी माशी

एका वसाहतीमध्ये केवळ एकच राणी माशी असते. ही आकाराने सर्वांत मोठी असून वसाहतीची प्रमुख असते.

ही माश्‍या कामकरी माश्‍यांपेक्षा आकाराने दुप्पट असते.

राणी माशीला दंश करणारा काटा नसतो. हिचे आयुष्य २ ते ३ वर्षे असते.

राणी माशीला केवळ अंडी घालावयाचे काम असते. ती दिवसाला ५०० ते १००० अंडी घालते.

राणी माशी फलित आणि अफलित अशा दोन प्रकारची अंडी घालते. फलित अंड्यापासून राणी आणि कामकारी माश्‍यांचा जन्म होतो. तर अफलित अंड्यापासून नर माश्‍यांचा जन्म होतो. फलित अंड्यांपासून जन्माला येणाऱ्या अळीला राणी माशी करावयाचे असते. अशा अळीला भरपूर व पौष्टिक अन्नाचा पुरवठा कायम चालू असतो. यालाच ‘रॉयल जेली’ असे म्हणतात.

रॉयल जेली कामकरी माशीच्या डोक्यातील विशिष्ट ग्रंथीत तयार होते.

नर माशी

नर माशी ही आकाराने राणीमाशीपेक्षा लहान आणि कामकरी माश्‍यांपेक्षा मोठी असते.

नर माश्‍यांना देखील राणीमाशीप्रमाणेच दंश करणारा काटा नसतो.

राणी माशीने घातलेल्या अफलित अंड्यांमधून नरमाशी जन्माला येते. नर रंगाला काळे असतात.

एका वसाहतीमध्ये २०० ते ५०० नर असतात.

नर माश्‍यांचे काम केवळ राणीमाशीसोबत मिलन करणे आणि मधपेटीत हवे असणारे तापमान निर्माण करणे हे आहे.

मिलनानंतर नरमाशी मृत्युमुखी पडते. नर माशीचे आयुष्य १ ते २ महिने असते.

कामकरी माश्‍या

या आकाराने सर्वांत लहान असतात.

राणीमाशीने घातलेल्या फलित अंड्यांपासून कामकरी माश्‍या निर्माण होतात.

या माश्‍यांना विषारीकाटा असतो. शत्रूपासून पोळ्याचे संरक्षण करण्याचे काम प्रामुख्याने कामकरी माश्‍या करतात.

फलित अंड्यांमधून निर्माण झालेल्या अळ्या या सारख्याच असतात, परंतु त्यातील एका अळीला पौष्टिक खाद्य (रॉयल जेली) दिल्यामुळे तिची वाढ इतर कामकरी माश्‍यांच्या दुप्पट होते. अशा प्रकारे राणी माशी जन्माला येते. परंतु उर्वरित अळ्यांना दुय्यम दर्जाचे व अपुरे अन्न दिल्यामुळे त्यांची वाढ होत नाही. अशा अळ्यांपासून कामकरी माश्‍या तयार होतात.

कामकरी माश्‍या या राणी माशी प्रमाणेच असतात. परंतु त्या आकाराने लहान असून, त्यांच्या जननेंद्रियांची वाढ पूर्ण झालेली नसते. त्यामुळे त्या नरासोबत संयोग करू शकत नाही.

कामकरी माश्‍यांचे आयुष्यमान ४ आठवडे ते ६ महिने इतके असते.

कामकरी माश्‍या वसाहतीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. त्या वसाहतीमध्ये अनेक प्रकारची कामे करतात.

कामकरी माश्‍यांचे कार्य

पोळे बांधणे.

मकरंद परागकण गोळा करणे.

पाणी आणणे.

नवीन राणी माशी तयार करणे व तिची काळजी घेणे.

पाणी, परागकण, मकरंद इत्यादी अन्नसाठा कुठे आहे हे शोधून काढणे.

पोळ्यांचे संरक्षण करणे.

मधमाशीपालनातून मिळणारी उत्पादने

मेण

मधमाशीपालनातून मेणाचे उत्पादन मिळते. या मेणाचा वापर चर्म उद्योग तसेच सौंदर्य प्रसाधनांमध्ये केला जातो. मेणबत्ती बनविण्यासाठी मधमाशीच्या मेणाचा उपयोग होतो.

रॉयल जेली

रॉयल जेली हा राणीमाशीला दिले जाणारा मुख्य अन्नस्रोत असतो. राणीमाशीला व तरुण अळी अवस्थेतील पिलावळीस हे भरवले जाते. मानवी आरोग्याच्या दृष्टीने रॉयल जेली उपयुक्त आहे.

बी व्हेनम

याचा उपयोग संधिवाताच्या उपचारासाठी केला जातो.

पराग

मधमाश्‍या फुलांवरून पराग गोळा करतात. त्याचा उपयोग त्यांच्या अन्नामध्ये होतो. परागामध्ये प्रथिनांचे प्रमाण खूप जास्त असते. परागाचा उपयोग औषध निर्मिती तसेच प्रथिनांच्या पावडरमध्ये केला जातो.

प्रोपोलिस

हा पदार्थ कामकरी माश्‍या झाडांमधून स्रवणाऱ्या डिंकापासून मिळवतात. याचा उपयोग वसाहतीतील डागडुजीच्या कामांमध्ये केला जातो. प्रोपोलिस हा पदार्थ औषधी गुणधर्मयुक्त असतो. त्याचा वापर जखमा भरून येण्यासाठी केला जातो.

मधमाश्‍यांसाठी उपयुक्त वनस्पती

कडुलिंब, शेवगा, जांभूळ, आंबा, लिंबू, बोर, संत्रा, मोसंबी, पेरू, चिंच, शिसम, अडुळसा, निरगुडी, कवट, आवळा, रिठा, गुलमोहर, बेल, वेडीबाभूळ, सुबाभूळ, निलगिरी, साल, करंज, भोपळा, काकडी, कोथिंबीर, दोडके, तूर, मूग, सूर्यफूल, तीळ, जवस, मोहरी, वाटाणा, चणा, कापूस, भेंडी, कोबी, फुलगोबी, गाजर, मुळा, कांदा, मोहरी, वांगे, टोमॅटो, गुलाब, ॲस्टर, झेंडू इत्यादी.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Upsa Irrigation Scheme : परभणी, मानवत तालुक्यांत उपसा सिंचन योजना प्रस्तावित

Bullet Train : बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम सुसाट

Crop Loan : पीककर्ज वाटपप्रकरणी दाखल गुन्हे मागे घ्या

Panchganga Sugar Factory : पंचगंगा साखर कारखान्याच्या वार्षिक सभेला गालबोट, कार्यकर्त्यांमध्ये हमरीतुमरी

Electricity Bill Waive : कोल्हापुरातील पाणी संस्थांना वीजबिल माफीची प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT