Beekeeping
Beekeeping Agrowon

Beekeeping Business : शाश्‍वत शेतीसाठी मधमाश्‍या महत्त्वाच्या...

Beekeeping News : भारतात मधमाशीपालन व्यवसाय वेगाने वाढत आहे. या व्यवसायातून अतिरिक्त उत्पन्न मिळू शकते.

माधुरी आवटे, गणेश चवरे

Honey Bee Update : भारतात मधमाशीपालन व्यवसाय वेगाने वाढत आहे. या व्यवसायातून अतिरिक्त उत्पन्न मिळू शकते. परपरागीभवनामुळे निर्माण होणाऱ्या बियांमध्ये, फळांमध्ये जनुकीय विविधता असते. त्यांची प्रत उच्च दर्जाची असते, त्यांची उगवण क्षमताही जास्त असते.

मधमाश्‍या या परागीकरणाचे काम उत्तमरीत्या करतात. मधाच्या सेवनाने मानवाचे आरोग्य उत्तम राहते. औषधाचे काम करते. रक्तदाब, लठ्ठपणा आदी रोगांमध्ये फायदा होतो.

मध - मध हे मानवी अन्नामध्ये विशेष भूमिका निभावते. १०० ग्रॅम मधातून ३०४ कॅलरी ऊर्जा मिळते, तसेच यामध्ये मेद नसतात. चरबी घटविण्यासाठी मधाचा उपयोग केला जातो. 

मेण - मधमाशीपालनातून मेणाचे उत्पादन मिळते. या मेणाचा वापर चर्म उद्योग, तसेच सौंदर्य प्रसाधनांमध्ये केला जातो. मेणबत्ती बनविण्यासाठी मधमाशीच्या मेणाचा उपयोग होतो.

बी व्हेनम -याचा उपयोग संधिवाताच्या उपचारासाठी केला जातो.

Beekeeping
Honey Bee Keeping : मधमाशीपालन करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाल?

पराग - मधमाश्‍या फुलांवरून पराग जमा करतात याचा उपयोग त्यांच्या अन्नामध्ये होतो. परागामध्ये प्रथिनांचे प्रमाण खूप जास्त असते. परागाचा उपयोग औषध निर्मिती तसेच प्रथिनांच्या पावडरमध्ये केला जातो.  

रॉयल जेली - हे मधमाशीच्या राणीला दिले जाणारा मुख्य अन्न स्रोत असतो. राणीमाशीला व तरुण अळी अवस्थेतील पिलावळीस हे भरवले जाते. मानवी प्रजननात दोषांवर औषध म्हणून रॉयल जेलीचा वापर होतो. तारुण्य टिकविण्यासाठी रॉयल जेली महत्त्वाची आहे.  

प्रोपोलिस -  प्रोपोलिस हा पदार्थ कामकरी माश्‍या झाडांमधून स्रवणाऱ्या डिंकापासून मिळवतात, याचा उपयोग वसाहतीतील डागडुजीच्या कामामध्ये केला जातो. प्रोपोलिस हा पदार्थ औषधी गुणधर्मयुक्त असतो त्याचा वापर जखम भरून येण्यासाठी केला जातो.

मधमाशी संवर्धनासाठी... 

- मधमाश्‍यांची पोळी जाळून किंवा धूर देऊन काढू नयेत.

- शेतीमध्ये मधमाश्‍या असताना कीटकनाशकांच्या फवारण्या करू नयेत. अपरिहार्यता असेल तर संध्याकाळी कराव्यात.

- शास्त्रीय प्रशिक्षण घेऊन मधमाशीपालन व्यवसाय सुरू करावा.

- शेताच्या आजूबाजूची मधमाश्‍यांची पोळी काढू नयेत.

- मधमाशी संवर्धनाविषयी जनजागृती करावी.

- मधमाश्‍यांची संख्या वाढविण्यासाठी शेताच्या परिसरात सपुष्प वनस्पतींची लागवड करावी.

(कृषी तंत्र विद्यालय, मलकापूर, जि. बुलडाणा)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com