Devendra Fadnavis Agrowon
ॲग्रो विशेष

CM Devendra Fadnavis: गायकवाड यांच्या हल्लेखोरांवर कडक कारवाई करू: मुख्यमंत्री

Akkalkot Attack: सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्लाप्रकरणातील आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल.

बाळासाहेब पाटील

Mumbai News: सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्लाप्रकरणातील आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी (ता. १४) दिले.

संभाजी ब्रिगेडचा नामविस्तार करून तो छत्रपती संभाजी ब्रिगेड करावा, अशी मागणी करत अक्कलकोट येथे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करण्यात आला. त्यांच्यावर तेलमिश्रीत काळे ओतून त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न झाला. या प्रकरणात शिवधर्म प्रतिष्ठान नावाच्या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी हा हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे.

सोमवारी (ता. १४) विधानसभेत प्रश्नोत्तराचा तास संपून शासकीय कामकाज संपल्यानंतर अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एकाच विषयावर चार स्थगन प्रस्ताव आल्याचे सांगत काँग्रेसचे ज्येष्ठ सदस्य विजय वडेट्टीवार यांना या विषयावर बोलण्याची संधी दिली. श्री. वडेट्टीवार यांनी याप्रकरणी कडक कारवाईची मागणी केली.

ते म्हणाले, ‘सकल मराठा समाजाच्या कार्यक्रमासाठी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष गायकवाड गेले होते. तेथे त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. त्यांना गाडीतून बाहेर खेचून पाडण्यात आले. त्यांना काळे फासण्यात आले. हा त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न होता. गायकवाड यांच्यावर अमानुषपणे हल्ला प्रकरणात एका पक्षाचा कार्यकर्ता असून त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे.

त्याच्यावर पिस्तूल बाळगण्याबरोबर चुलत भावाची हत्या केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून या प्रकरणी त्याने तुरुंगवासही भोगला आहे, अशी माहिती सभागृहात त्यांनी दिली. तसेच अक्कलकोट येथे महत्त्वाचा कार्यक्रम असूनही तेथे गुप्तवार्ता विभागाचे पोलीस नव्हते. तसेच पोलीस बंदोबस्तही नव्हता, असा आरोपही त्यांनी केला.

यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी, संबंधित आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. तो कोणत्याही पक्षाचा असला तरी कारवाई केली जाईल. गायकवाड यांना पोलिसांनी फिर्याद देण्याबाबत विचारणा केली मात्र, त्यांनी नकार दिला. मात्र, पोलिसांनी तक्रार दाखल करून संबधित आरोपींना अटक केली आहे, असे स्पष्ट केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Paddy Plantation Machine: आजऱ्यात होणार यंत्राद्वारे भातलागण

Onion Harvesting Delay: खानदेशात कांदा काढणी रखडली

Fish Industry Development: माफसू साकारणार ‘मत्स्य तंत्रज्ञान संकुल’

Sugarcane FPR Delay: सोलापुरात २७६ कोटी एफआरपी थकीत; कारखानदारांकडून दिशाभूल

Nashik District Bank: नाशिक जिल्हा बॅंकेला ७५३ कोटींचे भागभांडवल

SCROLL FOR NEXT