Kharif Season 2025 Agrowon
ॲग्रो विशेष

Kharif Season : बियाणे, खते, पीककर्ज उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन करा

Pankaja Munde : पीक पेरणीची योग्य पद्धत, बियाण्यांची निवड आणि पेरणीपूर्व प्रक्रिया, पेरणीचा योग्य कालावधी आदीबाबतीची माहिती शेतकऱ्यांना द्यावी. त्यांच्यापर्यंत अत्याधुनिक तंत्र पोहोचविण्यासाठी समन्वय ठेवावा.

Team Agrowon

Jalna News : पीक पेरणीची योग्य पद्धत, बियाण्यांची निवड आणि पेरणीपूर्व प्रक्रिया, पेरणीचा योग्य कालावधी आदीबाबतीची माहिती शेतकऱ्यांना द्यावी. त्यांच्यापर्यंत अत्याधुनिक तंत्र पोहोचविण्यासाठी समन्वय ठेवावा. विविध पिकांच्या पेरणीची योग्य वेळ आणि पद्धत, उत्पादकता वाढवून शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळेल यासाठी प्रयत्न करा, अशा सूचना पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी दिल्या.

जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात शनिवारी (ता. ३) आयोजित खरीप हंगाम पूर्व आढावा बैठकीत श्रीमती मुंडे बोलत होत्या. पालकमंत्री श्रीमती मुंडे म्हणाल्या, की पुरेसा पाऊस झाल्यावरच शेतकऱ्यांनी पेरणी करावी. यासाठी कृषी विभागाने व्यापक जनजागृती करावी. जिल्ह्यात बोगस बियाणे आणि रासायनिक खतांची विक्री होऊ नये, यासाठी पथके स्थापन करून, दोषींवर कायदेशीर कडक कारवाई करावी. शेतकऱ्यांच्या तक्रारी प्राप्त होताच पंचनामे करून बियाणे नमुने तपासण्यापेक्षा बियाणे पुरवठादारांकडील साठे तपासून त्याचवेळी त्याची गुणवत्ता तपासावी.

तसेच जादा दराने खत विक्री करणे, खतांचा साठा करून ठेवणे, असे अवैध काम करणाऱ्यावर तत्काळ कारवाई करावी. शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी व त्यांच्या तक्रारींच्या निराकरणासाठी योग्य उपाययोजना कराव्या. बैठकीच्या प्रारंभी पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते जालना कृषी विभागाच्या व्हॉट्‍सॲप चॅनेल आणि घडीपत्रिकाचे विमोचन करण्यात आले. बैठकीस उपजिल्हाधिकारी, तहसीलदार,

जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक प्रेषित मोघे, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था परमेश्‍वर वरखडे, कृषी विकास अधिकारी प्रभाकर बनसावडे, सर्व उपविभागीय कृषी अधिकारी व सर्व तालुका कृषी अधिकारी या वेळी उपस्थिती होते. लाभार्थ्यांना पंतप्रधान कुसुम योजना आणि मागेल त्याला सौर कृषी पंप योजनांचा लाभ वेळेत मिळावा यासाठी नियोजन करावे. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना अंतर्गत लाभार्थ्यांना वेळेत लाभ देण्यात यावा, अशा सूचना पालकमंत्री श्रीमती मुंडे यांनी या वेळी दिल्या.

कर्ज वितरण जूनपूर्वी पूर्ण करा

खरीप हंगामाकरिता शेतकऱ्यांना बँकेच्या माध्यमातून होणारे कर्ज पुरवठ्याचे उद्दिष्ट हे जूनपर्यंत पूर्ण करावे. शेतकऱ्यांना बँकेत चकरा माराव्या लावू नये याची दक्षता घ्यावी, अशा सूचना श्रीमती मुंडे यांनी दिल्या.

पाणीटंचाईचा त्रास होणार नाही याची दक्षता घ्या

जिल्ह्यातील ज्या गावातून टँकरची मागणी होताच, त्या गावास तत्काळ पाणी उपलब्ध करून देण्यात यावे. तसेच टँकर, पूरक नळ योजना, विहीर अधिग्रहण इत्यादी उपाययोजनांद्वारे सर्वसामान्य नागरिकांना नाही याची जिल्हा प्रशासनाने दक्षता घ्यावी असे निर्देशही पालकमंत्री श्रीमती मुंडे यांनी दिले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Crisis: सणासुदीला अस्मानीचे संकट कायम

Farmer Aid: अतिवृष्टी अनुदानाचे २५३ कोटी रुपये पोर्टलवर अपलोड

Farmers Support: नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकारने खंबीरपणे उभे राहायला हवे

Farmers Protest: राज्य सरकारच्या निषेधार्थ परभणीत आंदोलने

Dams Status: आवक घटल्याने प्रकल्पांची पाणीपातळी स्थिर

SCROLL FOR NEXT