Sugarcane Rate Farmer agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Rate Farmer : ऊस दराच्या मुद्दावर कारखानदारांची गट्टी तर शेतकरी चळवळींनीही आवळली मुठ्ठी, संघर्ष अटळ!

Sugarcane FRP : स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि आंदोलन अंकुश या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चळवळ करणाऱ्या दोन प्रमुख संघटना आहेत.

sandeep Shirguppe

गणेश शिंदे

Kolhapur Sugarcane Sanghatana : शिरोळ तालुका हा चळवळीचा तालुका म्हणून ओळखला जातो. स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि आंदोलन अंकुश या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चळवळ करणाऱ्या दोन प्रमुख संघटना आहेत. ऊसदराच्या आंदोलनात दरवर्षी दोघांच्याही भूमिका वेगवेगळ्या असतात. यातून सोशल मीडियातून एकमेकांवर टोकाचे आणि वैयक्तिक आरोप तालुक्याने पाहिले आहेत.

आता मात्र, कारखानदार आणि प्रशासनाकडून आंदोलन दुर्लक्षित होतअसताना दोन्ही संघटना एकत्र येऊन दरासाठी संघर्ष करत आहेत. यामुळे चळवळीची ताकद वाढली असली तरी पदरात पडणार किती याकडे शेतकऱ्यांचे लक्ष आहे.

यावर्षी स्वाभिमानी आणि आंदोलन अंकुशची ऊसदराची मागणी जवळपास समान आहे. दरवर्षी एकाच मागणीसाठी दोन संघटना वेगवेगळी आंदोलने करत होती.

यावर्षी देखील स्वाभिमानीची ऊस परिषद झाल्यानंतर आंदोलन अंकुशने शिरोळमध्ये एल्गार परिषदेचे आयोजन केले होते. यानंतर ऊसदराचे आंदोलन सुरू झाले. मात्र, कारखानदारांनी ऊस तोडी, वाहतुकीला सुरुवात केल्याने बऱ्याच ठिकाणी उसाची वाहतूक बिनविरोध सुरू झाली. यातूनच स्वाभिमानी आणि आंदोलन अंकुशच्या कार्यकत्यांनी एकत्रित येत यावर्षी आंदोलनाची जबाबदारी खांद्यावर घेतली आहे.

महिन्याभरापासून सुरू असलेल्या आंदोलनामुळे कारखानदार अथवा प्रशासनाने यात म्हणावी तशी मध्यस्थी केली नाही. उलट आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांची धरपकड करून चळवळीवर दबावतंत्र अवलंबण्याचा प्रकार सुरू असल्याचे कार्यकर्ते बोलून दाखवत आहेत.

ऊस हंगाम सुरू करण्यासाठी आता शेतकऱ्यांमध्येही कुरबुर सुरू झाली असून, शेतकऱ्यांना गतवर्षीचे बिल मिळवून देणे आणि दुसरीकडे शेतकऱ्यांचे समाधान करणे अशी दुहेरी कोंडी दोन्ही शेतकरी संघटनांची झाली आहे. आंदोलनप्रश्नी कोणतीही चर्चा होत नसताना लांबत चाललेला हंगाम सर्वांचीच डोकेदुखी बनत आहे. यातून सर्वमान्य तोडगा काढून तातडीने कारखाने सुरू करण्याची गरज आहे.

गतवर्षीचे चारशे रुपये वसूल केल्याशिवाय गप्प बसणार नाही. चळवळीला ताकद मिळत असेल आणि शेतकऱ्यांचे यातून हित होणार असेल तर आम्ही एकत्र येणे गैर काय? कारखानदार एक होऊ शकतात. मग चळवळ करणाऱ्या संघटनाही एकत्र यायला हव्यात.

- सावकार मदनाईक, स्वाभिमानी शेतकरी संघटना

दरवर्षी आंदोलने करूनच उसाला दर मिळत असेल तर हे योग्य नाही.कारखानदारांनीही उपपदार्थांना मिळालेला भाव साखरेचे वाढलेले दर याचा विचार करून नफ्यातील वाटा शेतकऱ्यांना दर देणे गरजेचे आहे. परिस्थितीनुरूप शेतकरी संघटना एकत्र येत आहेत ही बाब शेतकऱ्यांसाठी चांगली आहे.

- धनाजी चुडमुंगे, प्रमुख, आंदोलन अंकुश

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Vidhan Sabha Election Results : काँग्रेसच्या दिग्गजांना मोठा धक्का, पृथ्वीराज चव्हाण, थोरात, देखमुखांसह काँग्रेसचे अनेक दिग्गज पिछाडीवर

Climate Change Issue : हवामान बदलाच्या परिणामांना सामोरे जाण्यासाठी हवे ‘हवामान वित्त’

Maharashtra Vidhansabha Result 2024 : लाडकी बहिण योजनेचा महायुतीला फायदा; सोयाबीन दराचा मुद्दा ठरला 'फेल'?

Maharashtra Assembly Election : कोल्हापूर जिल्ह्यातील डझनभर कारखानदारांचे भवितव्य ठरणार, पहिल्या ३ तासांचा काय सांगतो कल

Farmers Exploitation : कोणा सांगाव्या शेतकऱ्यांच्या व्यथा

SCROLL FOR NEXT