Strawberry  Agrowon
ॲग्रो विशेष

Strawberry Season : पाणी टंचाईमुळे स्‍ट्रॉबेरी हंगाम अंतिम टप्प्यात

Water Shortage : राज्यात सर्वाधिक स्ट्रॉबेरी महाबळेश्‍वर तालुक्यात होत असते. या हंगामात एकट्या महाबळेश्‍वर तालुक्यात २८०० ते ३००० एकर क्षेत्रावर स्ट्रॉबेरीची लागवड झाली होती.

विकास जाधव 

Satara News : कमी पर्जन्यमानाचा इतर पिकांप्रमाणे स्ट्रॉबेरीसही फटका बसू लागला आहे. महाबळेश्‍वर तालुक्यात पाणीटंचाईच्या झळा तीव्र झाल्याने सुमारे एक ते दीड महिना हंगाम अगोदर संपणार असल्याचे शेतकरी सांगत आहेत. हंगाम लवकर संपल्याने एकूण हंगामाच्या २५ ते ३० टक्के उत्पादनात घट होणार आहे.

राज्यात सर्वाधिक स्ट्रॉबेरी महाबळेश्‍वर (Mahabaleshwar) तालुक्यात होत असते. या हंगामात एकट्या महाबळेश्‍वर तालुक्यात २८०० ते ३००० एकर क्षेत्रावर स्ट्रॉबेरीची लागवड झाली होती. तसेच वाई, जावळी, कोरेगाव, सातारा या सर्व तालुक्यांत मिळून एक हजार एकरांवर लागवड झाल्याचा अंदाज आहे. स्ट्रॉबेरी हंगामाची सुरुवात चांगली होती. या काळात २०० पासून ४०० रुपये किलोपर्यंत दर मिळाले होते.

डिसेंबर, जानेवारी महिन्यांत या दरम्यान दर टिकून होते. हा हंगाम चांगला जाईल असे वाटत असताना पाणीटंचाईने डोके वर काढले आहे. कमी पर्जन्यामुळे टंचाई झळा भीषण होऊ लागल्या आहेत. जिल्ह्यात सर्वच भागांत कमी अधिक प्रमाणात पाणीटंचाई जाणवू लागली आहे. यामुळे हा हंगाम मार्च अखेर संपण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

हंगाम लवकर संपला तर किमान २५ ते ३० टक्के उत्पादनात घट होणार आहे. यातून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. उन्हाची तीव्रता वाढत असल्याने महाबळेश्‍वर, पाचगणी पर्यटकांचा ओढा वाढणार आहे. मात्र पाण्या अभावी स्ट्रॉबेरी (Strawberry) मिळणार नसल्याने शेतकऱ्यांचा तोटा सहन करावा लागणार आहे.

नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात स्ट्रॉबेरीची लागवड होऊ लागली आहे. महाबळेश्‍वरच्या तुलनेत नाशिकच्या स्ट्रॉबेरीची चव कमी असली तरी प्रक्रियेस ही स्ट्रॉबेरी उपयुक्त ठरत असल्याने प्रक्रियेस जाणाऱ्या स्ट्रॉबेरीच्या दरात घसरण सुरू झाली आहे. सध्या या स्ट्रॉबरी प्रतिकिलो २५ ते ३० किलो मिळत आहे. अवेळी होणारा पाऊस, कमी-जास्त थंडी व उन्हाळ्यात पाणीटंचाई यामुळे महाबळेश्वश्‍वर तालुक्यातील स्ट्रॉबेरी पीक अडचणीत आले आहे.

हंगाम दृष्टिक्षेपात

- महाबळेश्‍वर तालुक्यात सरासरी तीन हजार एकर तर इतर तालुक्यांत एक हजार एकरवर स्ट्रॉबेरी लागवड.

- हंगामाच्या सुरुवातीस किलोला २०० ते ४०० रुपये मिळाला दर.

- कमी पर्जन्यमानामुळे एक ते दीड महिना अगोदर संपणार हंगाम.

- हंगाम लवकर संपत असल्याने २५ ते ३० टक्के उत्पादनात घट.

- इतर जिल्ह्यातील स्ट्रॉबरीमुळे प्रक्रियेसाठी जाणाऱ्या स्ट्रॉबेरीच्या दरात घट.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Laxman Hake: ओबीसींच्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली, तरीही लक्ष्मण हाके मुंबईकडे जाण्यावर ठाम

Chemical Fertilizer Efficiency: विविध उपायांद्वारे वाढवा रासायनिक खतांची कार्यक्षमता

National Common Mobility Card: एसटीच्या सवलतीच्या प्रवासासाठी आजपासून नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड अनिवार्य; महिला, ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्त्वाचा निर्णय

Madgyal Sheep Breed: ओळख माडग्याळ मेंढीची...

Sericulture Farming: रेशीम शेतीतून अर्थकारणाला गती

SCROLL FOR NEXT