डॉ. सचिकुमार नांदगुडे, कोमल रोकडे, ज्ञानेश्वर मोरेMonsoon Rainfall: पावसाचे प्रमाण मोजण्यासाठी पर्जन्यमापक या उपकरणाचा वापर केला जातो. याला प्लुव्हिओमीटर, ओम्ब्रोमीटर किंवा हायटोमीटर अशी नावे आहेत. पर्जन्यमापकाची अचूकता केवळ त्याच्या रचनेवरच नव्हे, तर तो ज्या ठिकाणी बसवला आहे, त्या जागेवर अवलंबून असते. म्हणूनच पर्जन्यमापक बसविताना काही मानक नियमांचे पालन करणे आवश्यक असते..पाऊस हा पृथ्वीवरील जलचक्राचा महत्त्वाचा घटक असून शेती, जलसंपदा आणि पर्यावरणासाठी अत्यंत आवश्यक आहे. एखाद्या ठिकाणी किती पाऊस पडला, हे पर्जन्यमान म्हणून व्यक्त केले जाते. पाऊस पडून जमिनीवरून वाहून गेला किंवा मुरला नाही, असे गृहीत धरल्यास तो पाणी किती खोलीपर्यंत साचेल, त्या खोलीला पर्जन्यमान असे म्हणतात. हे मापन सामान्यतः मिलिमीटर किंवा सेंटिमीटरमध्ये केले जाते. १ मिमी पाऊस म्हणजे १ चौरस मीटर क्षेत्रावर सुमारे १ लिटर पाणी साचणे होय. त्यामुळे पर्जन्यमानाची माहिती शेतकऱ्यांना पावसाचे प्रमाण आणि उपलब्ध पाण्याचा अंदाज घेण्यासाठी उपयुक्त ठरते. .Rainwater Harvesting: पर्जन्यजल संधारण : महत्त्व, नियोजन अन् प्रभावी व्यवस्थापन.पावसाचे प्रमाण मोजण्यासाठी पर्जन्यमापक या उपकरणाचा वापर केला जातो. यालाच प्लुव्हिओमीटर, ओम्ब्रोमीटर किंवा हायटोमीटर अशी नावे आहेत. सामान्यतः पर्जन्यमापकामध्ये वरच्या बाजूस फनेल असलेले बेलनाकार पात्र असते. या फनेलमधून पावसाचे पाणी संग्रह पात्रात जमा होते आणि त्याचे मापन केले जाते. मात्र पर्जन्यमापकाची अचूकता केवळ त्याच्या रचनेवरच नव्हे, तर तो ज्या ठिकाणी बसवला आहे त्या जागेवरही अवलंबून असते. म्हणूनच पर्जन्यमापक बसविताना काही मानक नियमांचे पालन करणे आवश्यक असते..पर्जन्यमापक बसवितानापर्जन्यमापक नेहमी सपाट, समतल आणि मोकळ्या जागेत बसवावा.पावसाचे पाणी गोळा करणारे मुख पूर्णपणे आडवे असावे.वाऱ्याचा परिणाम कमी करण्यासाठी तो जमिनीच्या शक्य तितक्या जवळ बसवावा; मात्र पाण्याचे तुषार उडणार नाहीत किंवा पाणी साचणार नाही, याची काळजी घ्यावी.पर्जन्यमापकाभोवती किमान ५.५ × ५.५ मीटर मोकळी जागा असावी.झाडे, इमारती किंवा इतर अडथळे पर्जन्यमापकापासून किमान ३० मीटर किंवा त्यांच्या उंचीच्या दुप्पट अंतरावर असावेत, जेणेकरून पर्जन्यमानाचे अचूक मापन करता येईल..पर्जन्यमापकांचे प्रकार१) नोंद न करणारा पर्जन्यमापकभारतामध्ये सर्वाधिक वापरला जाणारा नोंद न करणारा पर्जन्यमापक म्हणजे सायमन्स पर्जन्यमापक होय.या पर्जन्यमापकामध्ये १२.७ सेंमी व्यासाचे गोलाकार संकलन मुख असते. या मुखावर पडणारा पाऊस फनेलद्वारे खाली असलेल्या संकलन बाटलीत जमा होतो. पर्जन्यमापकाचे संकलन मुख जमिनीपासून सुमारे ३०.५ सेंमी उंचीवर बसविले जाते, जेणेकरून पावसाचे अचूक मापन करता येईल. संकलित झालेले पाणी विशेष मापन सिलिंडरद्वारे ०.१ मिमी अचूकतेने मोजले जाते. आजकाल पारंपरिक धातूच्या सायमन्स पर्जन्यमापकाऐवजी अधिक टिकाऊ फायबरग्लास रेइनफोर्स्ड पॉलिस्टर पर्जन्यमापकांचाही वापर वाढत आहे..फायदेरचना सोपी व मजबूत. किंमत कमी आणि देखभाल सुलभ.पर्जन्यमानाचे अचूक मापन.मर्यादाफक्त एकूण पर्जन्यमान मोजते.पावसाची वेळ, कालावधी किंवा तीव्रतेची माहिती मिळत नाही..२) नोंद करणारा पर्जन्यमापकनोंद करणारे पर्जन्यमापक पावसाचे प्रमाण, कालावधी, वेळ आणि तीव्रतेची सतत नोंद करतात. या माहितीवरून पर्जन्यमानाचा आलेख तयार करता येतो. त्यामुळे जलवैज्ञानिक अभ्यास, पूर विश्लेषण, हवामान अंदाज आणि जलसंपदा व्यवस्थापनासाठी हे उपकरण अत्यंत उपयुक्त ठरते..प्रमुख प्रकारअ) टिपिंग बकेट पर्जन्यमापकया पर्जन्यमापकामध्ये फनेलमधून पडणारे पाणी दोन लहान संतुलित बादल्यांमध्ये जमा होते. एका बादलीमध्ये ठराविक प्रमाणात (साधारण ०.२५ मिमी पर्जन्यमानाइतके) पाणी साचल्यानंतर ती आपोआप कलंडते आणि दुसरी बादली पाणी गोळा करण्यास सुरुवात करते. प्रत्येक वेळी बादली कलंडल्यानंतर त्याची इलेक्ट्रॉनिक नोंद घेतली जाते..फायदेपर्जन्यमानाची स्वयंचलित नोंद. पावसाची तीव्रता अचूक मोजता येते.डिजिटल प्रणालीशी सहज जोडता येते. स्वयंचलित हवामान केंद्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापर.मर्यादाअतिवृष्टीमध्ये किरकोळ त्रुटी संभवतात. नियमित स्वच्छता आणि कॅलिब्रेशन आवश्यक..Watershed Management: नाला अन् जलवाहिनी उपचार पद्धती.ब) वेईंग पर्जन्यमापकया प्रकारामध्ये पावसाचे पाणी वजनमापन प्रणालीवर बसविलेल्या पात्रात जमा केले जाते. पाण्याच्या वाढत्या वजनाची सतत नोंद करून पर्जन्यमान निश्चित केले जाते. या नोंदीवरून कालानुसार साचलेल्या पर्जन्यमानाचा आलेख तयार होतो..फायदेअत्यंत अचूक मापन. हिमवृष्टी आणि गारांचेही मापन करता येते.संशोधनासाठी उपयुक्त.मर्यादाकिंमत जास्त. देखभाल आणि कॅलिब्रेशन आवश्यक..क) फ्लोट किंवा नॅचरल सायफन पर्जन्यमापकया प्रकारात पावसाचे पाणी फ्लोट कक्षात जमा होते. पाण्याची पातळी वाढल्यावर फ्लोट वर सरकतो आणि त्याच्या हालचालीची नोंद चार्टवर केली जाते. पाणी ठराविक पातळीपर्यंत पोहोचल्यानंतर सायफन यंत्रणेद्वारे ते आपोआप बाहेर सोडले जाते आणि पुन्हा नवीन नोंद सुरू होते..फायदेसतत पर्जन्यमानाची नोंद. पावसाचा आलेख तयार होतो.जलवैज्ञानिक अभ्यासासाठी उपयुक्त.मर्यादायांत्रिक रचना गुंतागुंतीची. नियमित देखभाल आवश्यक.आधुनिक डिजिटल उपकरणांमुळे वापर कमी झाला आहे..ड) रिअल-टाइम पर्जन्यमापकहा नोंद करणाऱ्या पर्जन्यमापकाचा आधुनिक प्रकार आहे. यामध्ये इलेक्ट्रॉनिक सेन्सर, डेटा लॉगर तसेच उपग्रह किंवा आयओटी आधारित संप्रेषण प्रणालीचा वापर करून पर्जन्यमानाची माहिती रिअल-टाइममध्ये नियंत्रण केंद्रापर्यंत पाठविली जाते. सध्या प्रामुख्याने टिपिंग बकेट तंत्रज्ञानावर आधारित टेलिमेट्रिक पर्जन्यमापक वापरले जात आहेत..फायदेप्रत्यक्ष वेळेतील पर्जन्यमानाची माहिती उपलब्ध. दुर्गम भागातील माहिती सहज मिळते.हवामान अंदाज, पूर पूर्वसूचना आणि सिंचन नियोजनासाठी उपयुक्त.माहिती संगणक किंवा मोबाईलवर पाहता येते..मर्यादाउपकरणाची किंमत जास्त. संप्रेषण नेटवर्क, वीज, सौर ऊर्जेवर अवलंबून.नियमित देखभाल आवश्यक.- डॉ. सचिकुमार नांदगुडे, ७४४८०९९०८८ (प्राध्यापक व विभागप्रमुख, मृद् व जलसंधारण अभियांत्रिकी विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जि. अहिल्यानगर).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.