Strawberry Crop Subsidy : स्ट्रॉबेरी पिकासाठी अनुदान देण्यासाठी शासन प्रयत्नशील

CM Eknath Shinde : शेतकऱ्यांच्या हितासाठी स्ट्रॉबेरी पिकाला शासन अनुदान देण्यासाठी प्रयत्नशील असून याबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई व येथील आमदार मकरंद पाटील यांच्याशी चर्चा केली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
CM Eknath Shinde
CM Eknath ShindeAgrowon

Satara News : महाबळेश्वर तालुक्यात मोठ्या प्रमाणात स्ट्रॉबेरी उत्पन्न घेतले जाते. यावरच येथील शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी स्ट्रॉबेरी पिकाला शासन अनुदान देण्यासाठी प्रयत्नशील असून याबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई व येथील आमदार मकरंद पाटील यांच्याशी चर्चा केली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

पाचगणी येथील बिलीमोरिया शाळेच्या सभागृहात रविवारी (ता. १८) ‘स्ट्रॉबेरी विथ सीएम’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, ‘‘शेतकऱ्यांनी आता पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड दिली पाहिजे. शेत पिकावर प्रक्रिया उद्योग उभारल्यास शेतकऱ्यांना त्याचा अधिक फायदा होईल.

CM Eknath Shinde
Strawberry Production Satara : स्ट्रॉबेरी शेतीसाठी सरकारकडून अनुदान देण्याची घोषणा, वाईन निर्मीतीलाही चालना

या दृष्टीने शेतीमध्ये गुंतवणूक वाढविण्यासाठी ही प्रयत्न केले जात आहेत. आर्थिक उत्पन्न वाढावे म्हणून मागेल त्याला शेततळे, ठिबक सिंचन, एक रुपयात पिक विमा अशा अनेक योजना राबवीत आहोत.

CM Eknath Shinde
Strawberry farming : द्राक्ष नगरीत स्ट्रॉबेरीचा नवा मार्ग! नाशिकच्या आदिवासी पट्ट्यात रोजगाराच्या नव्या दिशा खुलणार

अतिवृष्टीत बाधित शेतकऱ्यांना एनडईआरएफ घ्या निकषांच्या दुपटीने आर्थिक मदत करण्याचा निर्णयही घेतला.’’ यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, अप्पर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, जिल्हाध्यक्ष कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे यांच्यासह स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘वाईन निर्मितीचा प्रकल्प महाबळेश्वरमध्ये उभारणार’

महाबळेश्वर व जावळी हे डोंगरी तालुके आहेत. येथील नागरिक कामासाठी मुंबई येथे जातात. ते पुन्हा गावात यावेत, नोकरीच्या शोधार्थ शहरात जाणाऱ्यांना स्थानिक पातळीवरच रोजगार उपलब्ध व्हावेत यासाठी पर्यटन वाढीसाठी बरोबर रोजगार निर्मितीवर भर देत आहोत. येथील शेतकऱ्यांनी बांबू लागवडीकडे वळावे.

बांबू नगदी पीक असून बांबूपासून फर्निचर, इथेनॉल निर्मिती करता येते. बांबू लागवडीसाठी शासन अनुदान देत असून याचा लाभ घ्यावा. स्ट्रॉबेरीपासून वाईन निर्मितीचा प्रकल्पही महाबळेश्वर येथे उभारण्यात येईल, असेही मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी या वेळी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com