Strawberry Cultivation  Agrowon
ॲग्रो विशेष

Strawberry Cultivation : महाबळेश्वरला स्ट्रॉबेरी लागवड सुरू

महाबळेश्वर तालुक्यातील सप्टेंबर महिन्याच्या अखेरपासून देशभरात प्रसिद्ध असेलेल्या स्ट्रॉबेरीच्या लागवडीस शेतकऱ्यांनी प्रारंभ केला.

विकास जाधव 

Satara News : देशभरात प्रसिद्ध असेलेल्या स्ट्रॉबेरीच्या लागवडीस महाबळेश्वर तालुक्यातील शेतकऱ्यांनी प्रारंभ केला. या हंगामात अमेरिकेतील पलमारिटा, पारथीऑन व इटली येथील एम-२ हे नवीन स्ट्रॉबेरी वाण लागवडीसाठी उपलब्ध झाले आहे. मातृवृक्ष वेळेत उपलब्ध झाल्याने या हंगामात सरासरीइतकी लागवड होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

जिल्ह्यात महाबळेश्वर, जावळी, वाई, कोरेगाव, पाटण व सातारा तालुक्‍यांत स्ट्रॉबेरी लागवड केली जाते. सर्वाधिक लागवड महाबळेश्वर तालुक्‍यात होते. महाबळेश्वर तालुक्यातील सप्टेंबर महिन्याच्या अखेरपासून स्ट्रॉबेरी लागवडीस प्रारंभ झाला आहे. जिल्ह्यात सरासरी १५०० हेक्टर तर महाबळेश्वर तालुक्यात १२०० ते १३०० हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र आहे. आतापर्यंत सर्वसाधारण क्षेत्रापैकी ३० ते ३५ टक्के क्षेत्रावर स्ट्रॉबेरी लागवडीचे काम पूर्ण झाले आहे.

या हंगामात अमेरिका, स्पेन, इटली देशांतून ४० ते ५० लाख मातृवृक्ष वेळेत आल्याने रोपाची निर्मिती वेळेत झाली आहे. रोप निर्मितीसाठी एकट्या महाबळेश्वर तालुक्यात १५० च्यावर पॉलिहाउसची उभारणी केली आहे. यामुळे महाबळेश्वर तालुक्‍यातील शेतकऱ्यांना स्ट्रॉबेरी रोपे तयार करता येत आहेत. यामुळे दर्जेदार रोपे तयार झाली असून खर्चातही मोठ्या प्रमाणात बचत होत आहे.

या हंगामात पूर्वी वाणासह अमेरिकेतील पलमारिटा, पारथीऑन व इटली येथील एम-२ या तीन नवीन स्ट्रॉबेरी वाणांची भर पडली आहे. बहुतांश शेतकऱ्यांच्या स्वतःच्या रोपाच्या नर्सरी असल्याने सध्या स्ट्रॉबेरी लागवडीस वेगात सुरू आहेत. एकाचवेळी लागवड सुरू असल्याने मजुरांची टंचाई भासत आहे.  

स्ट्रॉबेरीच्या उत्पादन खर्चात वाढ
महाबळेश्‍वर तालुक्यातील स्ट्रॉबेरी पिकाला लहरी वातावरणासह महागाईचा फटका बसू लागला आहे. कीटकनाशके, खते व मजुरांचे वाढलेले दर यामुळे स्ट्रॉबेरीची शेती करणे हे स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांसाठी जिकिरीचे बनत चालले आहे. शिवाय बदलत्या लहरी वातावरणाचा बसणारा फटका, मिळणारे उत्पादन आणि बाजारपेठेतील दर पाहता या सर्वांची गोळाबेरीज शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rabi Sowing : जालन्यात रब्बीची निम्मी पेरणी

Agriculture Method : पाणी, मातीची उत्पादकता वाढविणारी ‘पाच स्तरीय शेती’

Rabi Crop Management : रब्बी पिकांत संतुलित अन्नद्रव्ये व्यवस्थापन महत्त्वाचे

Sericulture Farming : रेशीम शेतीने दिला युवकांना रोजगार

Kolhapur Market Committee : कोल्हापूर बाजार समितीत कांदा, टोमॅटो, वांग्याची आवक वाढली, दरातही चढ उतार

SCROLL FOR NEXT