Team Agrowon
५९ व्या संयुक्त कृषी संशोधन आणि विकास समितीची बैठक २५ ते २७ मे दरम्यान महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे झाली. या बैठकीत स्ट्रॉबेरी पिकातील दोन शिफारशींना समितीची मान्यता मिळाली आहे,’’ अशी माहिती विभागीय गहू गेरवा संशोधन केंद्र, महाबळेश्वर येथील शास्त्रज्ञ डॉ. दर्शन कदम यांनी दिली
डॉ. कदम म्हणाले, ‘‘स्ट्रॉबेरी पिकात संप्रेरकांचा अनियंत्रित वापर केला जातो. यामुळे फुले व फळांची वाढ यावर विपरीत परिणाम होतो. तसेच लागवडीचा कालावधी देखील निश्चित नसल्याने रोपांचे व फळांचे नुकसान होते.
या समस्यांवर उपाय म्हणून विभागीय गहू गेरवा संशोधन केंद्र, महाबळेश्वर येथे तीन वर्षांच्या संशोधनानंतर काही शिफारशी करण्यात आल्या आहेत.’’
या संशोधनासाठी डॉ. कदम यांच्यासह डॉ. मनीष सुशीर, डॉ. विक्रांत साळी, डॉ. संदीप दिधुळे आणि केंद्र प्रमुख डॉ. दीपक देशमुख यांनी मेहनत घेतली. त
स्ट्रॉबेरी पिकाच्या अधिक उत्पादन आणि आर्थिक फायद्यासाठी महाबळेश्वर पठारावर वाफसा परिस्थितीत ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात लागवड करावी.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथील उद्यानविद्या विभागाचे प्रमुख डॉ. श्रीमंत रणपिसे, सहयोगी संशोधन संचालक डॉ. आर. आर. सूर्यवंशी, संशोधन संचालक डॉ. सुनील गोरंटीवार आणि कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील यांचे मार्गदर्शन लाभले आहे.