Strawberry  Agrowon
ॲग्रो विशेष

Strawberry Cluster : महाबळेश्‍वरच्या धर्तीवर भीमाशंकरला ‘स्ट्रॉबेरी क्लस्टर’

Strawberry Farming : स्ट्रॉबेरी उत्पादनासाठी पोषक वातावरण असलेल्या भीमाशंकर परिसरात स्‍ट्रॉबेरी उत्पादनाला चालना देण्यात येणार आहे.

गणेश कोरे

Pune News : ‘‘स्ट्रॉबेरी उत्पादनासाठी पोषक वातावरण असलेल्या भीमाशंकर परिसरात स्‍ट्रॉबेरी उत्पादनाला चालना देण्यात येणार आहे. यासाठी आदिवासी विभागाने पुढाकार घेतला आहे. कृषी विभागाच्या सहकार्याने महाबळेश्‍वरच्या धर्तीवर भीमाशंकर येथे स्ट्रॉबेरीचे क्लस्टर होणार आहे,’’अशी ग्वाही आदिवासी विकासमंत्री विजयकुमार गावित यांनी दिली.

‘‘सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी राज्य शासनाकडे पाठपुरावा केला. क्लस्टर निर्मितीतून महाबळेश्वरच्या धर्तीवर पर्यटन विकास आणि रोजगार निर्माती होण्यास मदत होईल. स्ट्रॉबेरीला प्रोत्साहन देण्यासाठी सर्व प्रकारची मदत आदिवासी विभाग करेल,’’ असे गावित म्हणाले.

भीमाशंकर परिसरात तरूण शेतकऱ्यांनी स्ट्रॉबेरी लागवडीचे प्रयोग सुरू केले आहेत. या प्रयोगांना यश मिळू लागले आहे. टप्प्याटप्प्याने स्ट्रॉबेरीचे क्षेत्र देखील वाढत आहे. यामुळे वळसे-पाटील यांच्या सूचनेनुसार कृषी विभागाने शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन सुरू केले आहे.

पूर्वतयारी म्हणून विविध भागातील माती परिक्षण केले आहे. तसेच आत्मा अंतर्गत शेतकऱ्यांना महाबळेश्वर येथे प्रशिक्षण देण्यात आले आहे. यामुळे आदिवासी शेतकऱ्यांना भात पिकानंतर स्ट्रॉबेरी लागवड करता येईल.

दरम्यान, स्ट्रॉबेरी पिकाला प्रोत्साहन देण्याबाबत मंत्रालयात आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी गावांमध्ये स्ट्रॉबेरी पीक उत्पादनासंदर्भात बैठक झाली. या वेळी सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील, आदिवासी समाजाचे नेते सुभाषराव मोरमारे, प्रकाश घोलप, संजय गवारी, संदीप चपटे, एकात्मिक आदिवासी प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी बळवंत गायकवाड, जिल्हा कृषी अधिकारी संजय काचोळे, खेड उपविभागीय कृषी अधिकारी सतीश शिरसाट, आंबेगाव तालुका कृषी अधिकारी साजना इंगळे उपस्थित होते.

आदिवासी विभागाकडून प्रतिगुंठा ५० हजार रुपये

मंत्री गावित म्हणाले, ‘‘आदिवासी विकास विभागाद्वारे स्ट्रॉबेरी उत्पादनासाठी मदत करण्यात येईल. कृषी विभागाद्वारे आदिवासी विभागाकडे स्ट्रॉबेरी लागवडीबाबतचा प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. या प्रस्तावाला मंजुरी व प्रत्येक आदिवासी शेतकऱ्यांना लागवडीसाठी पाच गुंठ्याला ५० हजार रुपये आदिवासी विभागाकडून अनुदान दिले जाईल.’’

आदिवासी शेतकऱ्यांच्या पडीक शेतजमिनीच्या विकासाठी वरदान ठरलेला पडकई कार्यक्रम गेली अनेक वर्षे बंद होता. हा कार्यक्रम नवीन नियमावलीसह मंजूर करण्याबाबत तत्वतः मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे स्ट्रॉबेरी लागवडीसाठी प्रोत्साहन मिळेल. पर्यटनवाढीसही चालना मिळेल.
- दिलीप वळसे-पाटील, सहकारमंत्री.
भीमाशंकर परिसरातील हवामान हे महाबळेश्‍वर सारखेच आहे. यामुळे या परिसरात स्ट्रॉबेरीच्या उत्पादनाला चांगला वाव आहे. भीमाशंकर आहूपे परिसरातील १५ ते २० गावांमधील ३०० शेतकऱ्यांची या प्रकल्पासाठी निवड केली आहे. त्यांना महाबळेश्‍वर येथे प्रशिक्षण दिले आहे. त्याद्वारे भीमाशंकरला स्ट्रॉबेरीचे क्लस्टर करण्याचे प्रयत्न आहेत
- संजय काचोळे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, पुणे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT