Fig Farming
Fig Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Drought In Maharashtra : दुष्काळी माळरानात दगडावरची पेरणी करणाऱ्या संस्थेची गोष्ट!

अभिजीत डाके

जत आणि दुष्काळ (Drought) हे समानार्थी शब्द आहेत. पाण्यापासून ते शिक्षणापर्यंत इथे सर्वच गोष्टींचं दुर्भिक्ष. हे दैन्य संपवण्यासाठी अनेकविध मार्गाने धडपड सुरू आहे. जतसारख्या भागात विकासाचे (Development) प्रयत्न म्हणजे दगड फोडून पाणी काढण्यासारखा प्रकार. मात्र गेल्या ४६ वर्षांत येरळा प्रोजेक्टने (Yerala Project) कर्नाटक सीमेवरच्या २८ गावांत शेती (Agriculture), शिक्षण, आरोग्य (Health) आणि रोजगार निर्मितीसाठी (Employment Generation) जिद्दीने काम करून दगडावर पेरणी केली आहे.

१९७२ च्या भीषण दुष्काळाच्या झळा या भागाने सोसल्या आहेत. त्याच्या आठवणी आजही अनेकांच्या डोळ्यासमोर तरळतात. अवर्षणाने हतबल झालेल्या जनतेला बळ देण्याची गरज होती. येरळा प्रोजेक्‍ट सोसायटीची १९७६ ला मुहूर्तमेढ रोवली गेली. प्रा. वसंतराव देशपांडे यांच्यासह भीमराव पाटील, ज्ञानू गायकवाड यांनी स्थापन केलेल्या या संस्थेची नोंदणी बॉम्बे ट्रस्ट ॲक्‍ट व सांगली जिल्हा धर्मादाय आयुक्ताकडे करण्यात आली.

केवळ पाण्याचा दुष्काळ हटवून दैन्यावस्था दूर होणार नाही; तर समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत विकासाची पेरणी झाली पाहिजे, या दृष्टिकोनातून ही संस्था आकाराला आली. १९९८ पर्यंत खानापूर तालुक्‍यातील ३२ गावांत संस्थेचे कार्यक्षेत्र मर्यादित होते. त्या काळी एचआयव्हीने हाहाकार माजवला होता. प्रबोधन आणि बाधितांना आधार या दोन्ही आघाड्यांवर संस्था मोठ्या झपाट्याने काम करत होती.

अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजांची पूर्तता करण्यासाठी संस्था धडपडत होती. त्यानुसार १९८५ ते १९९५ या दशकात खानापूर तालुक्‍यातील विटा-कमळापूर भागात सुमारे १६०० कुटुंबाना पक्की घरे बांधून देण्यात आली. डोक्यावर छत आले. पण पोटापाण्याचे काय असा प्रश्‍न समोर होताच. त्यासाठी संस्था पुन्हा सरसावली. डाळिंब बागा, पोल्ट्री फार्म, रेशीम लागवड, दूध उत्पादन, यंत्रमाग असे रोजगाराचे अनेक पर्याय उभे केले गेले. संस्थेच्या कामाला चांगलं यश आलं.

एका टप्प्यानंतर येरळाने खानापूर भागात कामाचा व्याप कमी केला. त्यानंतर संस्थेने जत तालुक्यावर दुष्काळी जत तालुक्याचा भौगौलिक विस्तार प्रचंड आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांच्या सीमावर्ती भागाची एक स्वतंत्र संस्कृती आहे. तिथे रोटी-बेटी व्यवहारांसह अन्य दैनंदिन सामाजिक व्यवहारही पूर्वापार आहेत. त्यामुळे ती गावं एकमेकांशी भावबंधनाने जोडली आहेत. मराठी ही आई तर कन्नड ही मावशी असा तेथील जनतेचा भाव आहे.

पाण्याची तहान असणारा इथला द्विभाषिक शेतकरी वर्षानुवर्षे पारंपरिक पद्धतीने काळ्या आईची सेवा करत आला आहे. मोठे उद्योगधंदे नाहीत, त्यामुळे हाताला रोजगार नाही. परिणामी, आर्थिक मागासलेपण, अंधश्रद्धा, अनिष्ट चालीरीतींच्या जोखडात अडकल्यासारखी स्थिती होती. मात्र येरळा प्रोजेक्ट सोसायटीने इथल्या लोकांच्या जीवनात बदल घडवण्याचं आव्हान स्वीकारलं...

(सविस्तर लेख वाचा अॅग्रोवनच्या दिवाळी अंकात...)

अॅग्रोवनचा दिवाळी अंक अॅमेझोन वर उपलब्ध.

अंक खरेदीसाठी खालील लिंकवर क्लिक करा -

अॅमेझोन लिंक- https://www.amazon.in/Agrowon-Diwali-ank-Shetmal-vikrichya/dp/8190638173

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Accident Insurance Scheme : अपघात विमा योजनेतून ४५० शेतकरी कुटुंबांना मदत

Banana Sunburn : उन्हाच्या तीव्रतेमुळे जळताहेत केळीची रोपे

Summer Heat : मालेगावात वैशाखाआधीच वणवा

Adulterated Milk : भेसळयुक्त दूध रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात

Water Scarcity : कळंबा परिसरात पाण्याचा प्रश्‍न गंभीर

SCROLL FOR NEXT