Unseasonal Rain Agrowon
ॲग्रो विशेष

Unseasonal Rain : खानदेशात वादळी पावसामुळे नुकसान सुरूच

Heavy Rain Crop Loss : खानदेशात मागील चार ते पाच दिवसांपासून रोज वादळी पाऊस येत आहे. यात केळीसह भाजीपाला पिकांची हानी होत आहे.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात मागील चार ते पाच दिवसांपासून रोज वादळी पाऊस येत आहे. यात केळीसह भाजीपाला पिकांची हानी होत आहे. मागील दोन दिवस सायंकाळी खानदेशात विविध भागांत वादळी पाऊस झाला. त्यापूर्वी मागील मंगळवारी (ता. ६) खानदेशात वादळी पाऊस झाला होता.

काही भागात गारपीटही झाली. यानंतर वादळी पावसाची मालिका सुरूच आहे. खानदेशात सुमारे आठ हजार हेक्टरला या पावसाचा फटका बसला. यात जळगाव तालुक्यात केळीची मोठी हानी झाली. तसेच जळगावातील चाळीसगाव, धरणगाव, भडगाव, एरंडोल, पारोळा, चोपडा या भागांतही नुकसान झाले.

खानदेशात रोज दुपारच्या सुमारास ढगाळ व पावसाळी वातावरण तयार होते. मध्येच ऊन असते. सुसाट वारा, वादळी पाऊस रोज सायंकाळी येत आहे. वादळी पावसामुळे नुकसान वाढत आहे. यामुळे पंचनाम्यांची व्याप्तीदेखील वाढत आहे.

जळगाव, चोपडा भागातील नुकसानीचे पंचनामे मागील आठवड्यातच पूर्ण झाले आहेत. नुकसानग्रस्त भागाची पाहणी पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केली. पण रोज वादळी पाऊस येत असल्याने नुकसानग्रस्त गावे व क्षेत्रात वाढ होत आहे.

रविवारीदेखील (ता. ११) सायंकाळी जळगाव जिल्ह्यातील एरंडोल, धरणगाव, जळगाव या भागात वादळी पाऊस झाला. काही भागांत हलका पाऊस व सुसाट वारा अशी स्थिती होती. यामुळे अनेक गावांतील वीजपुरवठा सायंकाळी काही तास बंद होता. रात्री गावांमधील वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Modern Agricultural Machinery: ट्रॅक्टरचलित रोटरी खुरपणी यंत्र

Rice Farming: भात शेतीसाठी ‘एडब्ल्यूडी’ तंत्रज्ञान

First T2T Genome of Pigeonpea : देशातील पहिला 'टी2टी' जीनोम विकसित; तूर उत्पादन वाढीसाठी होणार फायदा

Sugarcane Crop Damage: अतिवृष्टिबाधित लोळलेल्या उसाचे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना

Artificial Groundwater Recharge: कृत्रिम भूजल पुनर्भरणाचे तंत्रज्ञान

SCROLL FOR NEXT