Crop Damage  Agrowon
ॲग्रो विशेष

Banana Crop Loss : नांदेडमध्ये चार हजार हेक्टरवरील केळी बागांना पावसाचा फटका

Heavy Rain Crop Damage : एका तासाच्या वादळी वाऱ्यांसह झालेल्या पावसाने नांदेडमधील अर्धापूर, मुदखेड, हदगाव या तालुक्यांतील ६८ गावांतील पाच हजार ७१३ शेतकऱ्यांचे नुकसान झाले.

Team Agrowon

Nanded News : एका तासाच्या वादळी वाऱ्यांसह झालेल्या पावसाने नांदेडमधील अर्धापूर, मुदखेड, हदगाव या तालुक्यांतील ६८ गावांतील पाच हजार ७१३ शेतकऱ्यांचे नुकसान झाले. यात चार हजार १३३ हेक्टरवरील केळीच्या बागा भुईसपाट झाल्यामुळे शेतकऱ्यांना कोट्यवधींचा फटका बसला आहे.

काढणीस आलेल्या केळीच्या बागा उद्ध्वस्त झाल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरू झाले. नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर, मुदखेड, भोकर, हदगाव या तालुक्यातील केळी देश विदेशात निर्यात केली जाते. या भागात केळी लागवडीचे क्षेत्र चांगले असल्याने या भागातील अर्थव्यवस्था केळीवर अवलंबून आहे.

यंदाच्या कडक उन्हाळ्यात थेंब थेंब पाणी देऊन केळीच्या बागा शेतकऱ्यांनी जतन केल्या होत्या. यंदाच्या हंगामात भावही चांगला होता. त्यामुळे चार पैसे जास्त मिळतील या आशेवर तालुक्यातील केळी उत्पादक शेतकरी होते. परंतु वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे तासाभरात होत्याचे नव्हते झाले.

यामुळे उत्पादन तर बाजूला राहिले लागवड खर्च निघणे कठीण झाले आहे. या वादळाचा फटका नांदेडमधील अर्धापूर, मुदखेड, हदगाव या तालुक्यांतील ६८ गावांतील पाच हजार ७१३ शेतकऱ्यांना बसला आहे. यात चार हजार १३३ हेक्टरवरील केळीच्या बागा भुईसपाट झाल्यामुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण, खासदार रवींद्र चव्हाण, आमदार श्रीजया चव्हाण, शिवसेना जिल्हाप्रमुख बबन बारसे, प्रल्हाद इंगोले यांनी केली. भाजपचे जिल्हाध्यक्ष ॲड. किशोर देशमुख यांनी पालकमंत्री अतुल सावे यांची मुंबईत भेट घेऊन मदतीची मागणी केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Indian Economy : अर्थव्यवस्थेत पहिल्या तिमाहीत ७.८ टक्के वाढ; शेतीचं चित्र पावसावर अवलंबून

Plant Nutrition: अन्नद्रव्ये पिकांना कशी मिळतात?

Chickens Breeding Management: ब्रीडर कोंबड्यांचे प्रजनन व्यवस्थापन

Tribal Farmer Relief: वनपट्टेधारक आदिवासी शेतकऱ्यांनाही मिळणार कर्जमाफी, महसूलमंत्री बावनकुळेंची माहिती

Chakan Livestock Market: नावारूपाला आलेला चाकणचा जनावरांचा बाजार

SCROLL FOR NEXT