Water  Agrowon
ॲग्रो विशेष

Water Wastage : पाण्याची नासाडी थांबवा

मेवासी वन विभाग व सहयोग सोशल ग्रुपतर्फे बुधवारी (ता. २२) जागतिक जल दिन साजरा झाला.

Team Agrowon

Nandurbar News : पृथ्वीवर पाणी मुबलक प्रमाणात असले तरी ३ ते ४ टक्के पाणीच फक्त वापरण्यासाठी योग्य आहे. त्यामुळे सर्वांनी वेळीच पाण्याचे महत्त्व (Importance Of Water) ओळखून पाण्याची नासाडी थांबविली पाहिजे.

त्यासाठी विविध उपाय योजून पावसाचे वाहून जाणारे पाणी साचवून ते जिरविले पाहिजे. त्यातून पाण्याची पातळी (Water Level) वाढण्यास मदत होईल कारण जमिनीच्या पोटात पाणी सुरक्षित राहते, असे प्रतिपादन उपवनसंरक्षक लक्ष्मण पाटील यांनी केले.

येथील मेवासी वन विभाग व सहयोग सोशल ग्रुपतर्फे बुधवारी (ता. २२) जागतिक जल दिन साजरा झाला. यानिमित्त विविध प्रबोधनपर कार्यक्रम झाले. ठिकठिकाणी जलसेवेचे उद्‍घाटन करण्यात आले. या वेळी जल दिनानिमित्त सर्वांनी पाण्याचे संरक्षण करण्याची प्रतिज्ञा घेतली.

उपवनसंरक्षक लक्ष्मण पाटील अध्यक्षस्थानी होते. सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्पाधिकारी मंदार पत्की, जिल्हाध्यक्ष प्रा. आर. ओ. मगरे, सचिव अशोक सूर्यवंशी, वनक्षेत्रपाल स्वप्नील भामरे, वनक्षेत्रपाल रामकृष्ण लामगे, वनक्षेत्रपाल भूषण पाटील यांनी पाण्याचे महत्त्व सांगताना पाण्यासोबत वृक्षलागवड व त्यांचे संरक्षण यांचे महत्त्व सांगत याबाबत योग्य ते प्रबोधन होण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात यावेत, असे सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Administration Failure: गतिमान प्रशासन (!)

Mango Season: पावसामुळे सिंधुदुर्गात आंबा हंगाम महिनाभर लांबणार

Banana Market: खानदेशात केळीची आवक कमी कमाल दर ७०० रुपये प्रति क्विंटल

Soybean Procurement: सोयाबीन खरेदी १५ नोव्हेंबरपासून पणनमंत्री रावल : आजपासून नोंदणी

Bacchu Kadu: लोकन्यायालयाचा निर्णय मानणार: बच्चू कडू

SCROLL FOR NEXT