APMC Election : पंढरपूर, अकलूज, सांगोल्यासह आठ बाजार समित्यांची निवडणूक जाहीर

पंचवार्षिक मुदत संपलेल्या राज्यातील बाजार समित्यांच्या निवडणुका न्यायालयाच्या आदेशानुसार एप्रिलच्या आत पूर्ण करावयाच्या आहेत.
 Election
ElectionAgrowon

Solapur News : सोलापूर जिल्ह्यातील अकरापैकी आठ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणूका (APMC Election) जाहीर झाल्या असून, अकलूज, पंढरपूर, कुर्डुवाडी, मंगळवेढा, अक्कलकोट, दुधनी, मोहोळ आणि सांगोला या बाजार समित्यांचा त्यात समावेश आहे. पहिल्या टप्प्यातील बाजार समित्यांसाठी सोमवारपासून (ता. २७) उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत.

पंचवार्षिक मुदत संपलेल्या राज्यातील बाजार समित्यांच्या निवडणुका न्यायालयाच्या आदेशानुसार एप्रिलच्या आत पूर्ण करावयाच्या आहेत. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील अकलूज, पंढरपूर, कुर्डुवाडी, मंगळवेढा आणि अक्कलकोट या पाच बाजार समित्यांची निवडणूक होणार आहे.

 Election
Kalamana APMC : कळमना बाजारातील लुटीविरोधात ‘झेडपी’चा ठराव

त्यासाठी २७ ते ३ एप्रिल इच्छुकांना उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. पाच एप्रिलला छाननी तर सहा ते २० एप्रिलपर्यंत उमेदवारी मागे घेण्याची मुदत आहे. त्यानंतर २१ एप्रिलला उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध होईल आणि चिन्हांचे वाटप होईल.

२८ एप्रिलला मतदान आणि दुसऱ्यादिवशी मतमोजणी होणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील दुधनी, मोहोळ आणि सांगोला या बाजार समित्यांसाठीही निवडणूक प्रक्रिया अशीच राहणार आहे.

 Election
Nashik APMC Election : नाशिक जिल्ह्यातील १४ बाजार समितीचे बिगूल

केवळ मतदानाची तारीख बदलण्यात आली आहे. या तीन बाजार समित्यांसाठीही २७ मार्चपासूनच अर्ज दाखल होतील. तर मतदान ३० एप्रिलला होईल व त्याचदिवशी मतमोजणीही होणार आहे.

हा किरकोळ बदल वगळता या सर्व बाजार समित्यांच्या निवडणूका कोणत्याही परिस्थितीत एप्रिलअखेर संपविण्यात येणार आहेत.

शेतकरी थेट मैदानात येणार

यंदाच्या बाजार समितीच्या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे या बाजार समितीची निवडणूक कोणताही शेतकरी किमान दहा गुंठे शेती नावावर असणारा शेतकरी लढवू शकणार आहे. त्याशिवाय अन्य मतदारांमध्ये मात्र सोसायटी आणि ग्रामपंचायत सदस्य असणार आहेत.

त्यामुळे पहिल्यांदाच या निवडणुकीत चुरस पाहायला मिळणार आहे, शिवाय जिल्ह्यातील तब्बल आठ बाजार समित्यांच्या निवडणूका पार पडणार आहेत. त्यामुळे उत्सुकता वाढली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com