Bogus Seed Agrowon
ॲग्रो विशेष

Bogus Seed : बोगस बियाणे विक्री रोखा

Minister Girish Mahajan : "पिकाच्या उत्पादकता वाढीसाठी शेतकऱ्यांना पीक लागवडीबाबत मार्गदर्शन करण्याबरोबरच जिल्ह्यात कुठेही बोगस बियाणे विक्री होणार नाही, याची दक्षता कृषी विभागाने घ्यावी,’’ असे निर्देश पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिले.

Team Agrowon

Bogus Seed Dhule Update : ‘‘पिकाच्या उत्पादकता वाढीसाठी शेतकऱ्यांना पीक लागवडीबाबत मार्गदर्शन करण्याबरोबरच जिल्ह्यात कुठेही बोगस बियाणे विक्री होणार नाही, याची दक्षता कृषी विभागाने घ्यावी,’’ असे निर्देश पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात मंत्री महाजन यांनी ऑनलाइन खरीपपूर्व हंगाम आढावा बैठक घेतली.

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा आश्‍विनी पवार, आमदार मंजुळा गावित, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुरबान तडवी, जिल्हा उपनिबंधक मनोज चौधरी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. आमदार जयकुमार रावल, जिल्हा परिषदेचे सभापती संजीवनी शिसोदे ऑनलाइन सहभागी झाले.

पालकमंत्री महाजन म्हणाले, ‘‘शेतकऱ्यांचा खरीप हंगाम सुकर होण्यासाठी आवश्यक सर्व बाबी मुबलक प्रमाणात उपलब्ध असणे गरजेचे आहे. त्यासाठी सर्व संबंधित विभागांनी आवश्यक नियोजन करावे. खरीप पीककर्ज वेळेत वितरित करावे.

पीककर्जासाठी शेतकऱ्यांची अडवणूक होणार नाही, याची दक्षता बॅंकांनी घ्यावी. ज्या बँका पीककर्जासाठी शेतकऱ्यांची अडवणूक करतील, त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा. जिल्ह्यातील पीक लागवड लक्षात घेऊन आवश्यक ते बी-बियाणे, खते व कृषी निविष्ठा मुबलक उपलब्ध ठेवावे.’’

पाच भरारी पथके स्थापन

जिल्हास्तरावर एक, तर तालुकास्तरावर प्रत्येकी एक याप्रमाणे एकूण पाच गुणनियंत्रण भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत. जिल्ह्यात बी-बियाणे व खतांची कमतरता भासणार नाही, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तडवी यांनी बैठकीत दिली.

दुकानांच्या तपासणीचा आदेश

‘‘बी-बियाण्यांच्या बाबतीत शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही. तसेच जिल्ह्यात कुठेही बोगस बियाणे व खते विक्री होणार नाहीत, यासाठी कृषी विभागाने खते व बियाणे विक्री करणाऱ्या दुकानांची तपासणी करावी. शेतकऱ्यांना मागणीनुसार खते व बियाण्यांचा पुरवठा होणे आवश्यक आहे.

तसेच नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण म्हणून शेतकऱ्यांना पीकविम्याबाबत मार्गदर्शन करावे. शिवाय शेतकऱ्यांच्या लाभाच्या योजनांची माहिती द्यावी. जिल्ह्यात फळबाग लागवड वाढीसाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून २०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष म्हणून घोषित आहे. यास अनुसरून तृणधान्याच्या लागवड क्षेत्राच्या वाढीसाठी प्रयत्न व्हावेत,’’ असे महाजन यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

CJP Protest: तरुणांच्या आंदोलनाची धग वाढली, देशभरातून पाठिंबा, सरकारकडून चर्चेची तयारी, पण 'सीजेपी'ने ठेवल्या अटी

Agrowon Podcast: सोयाबीन दरात चढ-उतार, हरभरा आवक स्थिर, टोमॅटो भाव कायम,शेपू दबावातच तर मोसंबी दरात नरमाई

Government Schemes Planning: योजनांच्या लाभासाठी सक्षम प्रकल्प आराखडा महत्त्वाचा : अनिसा महाबळे

Tomato Mar Rog: टोमॅटो पिकातील जिवाणूजन्य मर रोगाची लक्षणे आणि उपाय काय?

Buldhana DCC Bank Election: बुलडाणा जिल्हा बँकेची निवडणूक ठरणार लक्षवेधी

SCROLL FOR NEXT