Ajit Pawar Agrowon
ॲग्रो विशेष

Raisin Illegal Import: चीनमधून बेदाण्यांची बेकायदा आयात थांबवा

Ajit Pawar: चीनमधून कर चुकवून निकृष्ट बेदाण्यांची भारतात मोठ्या प्रमाणावर आयात होत आहे. यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे आणि राष्ट्रीय महसुलाचे नुकसान होत आहे. चीनमधून होणारी बेदाण्यांची बेकायदा आयात तत्काळ थांबवावी.

गणेश कोरे

Pune News: चीनमधून कर चुकवून निकृष्ट बेदाण्यांची भारतात मोठ्या प्रमाणावर आयात होत आहे. यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे आणि राष्ट्रीय महसुलाचे नुकसान होत आहे. चीनमधून होणारी बेदाण्यांची बेकायदा आयात तत्काळ थांबवावी.

तसेच बेदाण्यांचे दर स्थिर ठेवून उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने कराव्यात, अशी मागणी उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी पत्राद्वारे केंद्र सरकारकडे केली आहे.

याबाबत उपमुख्यमंत्री पवार यांनी केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याणमंत्री शिवराजसिंह चौहान तसेच केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांना पत्र लिहून मागण्या केल्या आहेत. पत्रात म्हटले आहे, की चीनमधून निकृष्ट दर्जाच्या बेदाण्यांची बेकायदा आयात वाढली आहे.

आयात कर आणि शुल्क चुकवून बेदाणे मोठ्या प्रमाणावर भारतात आणले जात आहेत. या करचोरीमुळे शासनाचा महसूल बुडत असल्याने नुकसान होत आहे. ऐन हंगामात होत असलेल्या बेकायदा आयातीमुळे देशातील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या

बेदाण्यांचे दर प्रतिकिलो शंभर ते सव्वाशे रुपयांनी घसरले आहेत.

शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी केंद्र सरकारने तत्काळ उपाययोजना करण्यात याव्यात. बेकायदा आयात व विक्री थांबवण्यासाठी कठोर कारवाई करावी. आयात होणाऱ्या बेदाण्यांचा दर्जा तपासण्यासाठी तसेच करवसुली योग्य, अचूक होण्यासाठी बंदरे, विमानतळ, बाजारपेठांच्या ठिकाणी तपास व करवसुली यंत्रणा कार्यक्षम करावी. ऐन हंगामात बाजारातील बेदाण्यांचे दर स्थिर राखून शेतकऱ्यांचे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, अशा मागण्या श्री. पवार यांनी केल्या आहेत.

महाराष्ट्र राज्य द्राक्ष उत्पादक संघाने यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन या प्रश्‍नांकडे त्यांचे लक्ष वेधले होते. तसेच हे प्रश्‍न सोडविण्याची मागणी केली होती. त्या अनुषंगाने श्री. पवार यांनी केंद्र सरकारला पत्र लिहिले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Welfare Schemes: पंतप्रधान मोदींच्या कार्यकाळात शेतकऱ्यांसाठी कल्याणकारी योजना

Agricultural Pump Cable Theft: केबल जाळून त्यातील कॉपर वायर लंपास

Urea Shortage: युरिया टंचाईचा प्रश्न मिटणार? सरकारचा दावा

Storm Damage: वादळाचा पॉलिहाउस, सौरकृषी पंप पॅनेलला तडाखा

Farm Loan Waiver: कर्जमुक्ती योजनेत २९ हजार शेतकऱ्यांवर अपात्रतेची भीती

SCROLL FOR NEXT