Maharashtra Bandh Agrowon
ॲग्रो विशेष

Maharashtra Bandh : जरांगेंच्या उपोषणाचा पाचवा दिवस, नाकातून रक्तस्त्राव; महाराष्ट्र बंदला संमिश्र प्रतिसाद

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाच्या मागणसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे पुन्हा एकदा उपोषणाची सुरूवात केली आहे. १० फेब्रुवारीपासून उपोषणाला बसले असून बुधवारी त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : मराठा समाजाचे आरक्षण मिळवण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आरक्षणाचा मार्ग अवलंबला आहे. बुधवारी (ता. १४) त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस होता. उपोषणा दरम्यान त्यांची प्रकृती खालावत चालली आहे. त्यांच्या नाकातून काहीसा रक्तस्राव झाल्याची माहिती नागरिकांनी दिली. मराठा समाजाकडून राज्यभर संताप व्यक्त होत आहे. यादरम्यान घटनास्थळी आरोग्यपथकाकडून जरांगे पाटील यांच्यावर इलाज करण्यात येत आहे. त्यांना सलाईन लावण्यात आली आहे. मात्र ती काढून टाकत जरांगे पाटील यांनी झोपेत असताना सलाईन लावल्याचा आरोप केला आहे.

सलाईन लावायची असेल तर अगोदर अंमलबजावणी कधी करता सांगा, असा सवाल सरकारला केला आहे. तसेच झोपेत असताना सलाईन लावल्याचा आरोप केला. "मला काही झाले, मी मेलो तर तसाच मला त्यांच्या दारात नेऊन टाका," असेही जरांगे म्हणाले.

मराठा आरक्षणासाठी चर्चा करण्यासह यावर निर्णय घेण्यासाठी २० फेब्रुवारीला विशेष अधिवेशन सरकार बोलणार आहे. तर याच अधिवेशनात राज्य मागासवर्ग आयोग मराठा समाजाच्या सर्वेक्षणाचा अहवाल सादर करेल, अशी चर्चा होती. मात्र आता आयोगाने राज्य सरकारकडे आणखी वेळ मागितली आहे. अहवालाचं काम पूर्ण करण्यासाठी आणखी २ ते ३ दिवस वाढवून द्यावेत अशी मागणी आयोगाने सरकारकडे केली आहे.

महाराष्ट्र बंदची हाक

मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने काढलेल्या अधिसूचनेच्या अंमलबजावणीसाठी विशेष अधिवेशन बोलावावे आणि जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मराठा समाजाकडून आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती.

धाराशीवमध्ये संयमाचा उद्रेक

यावेळी सरकारच्या चालढकल वृत्तीमुळे धाराशिवमध्ये मराठा समाजाच्या संयमाचा उद्रेक झाला. येथे सरकार मनोज जरांगे यांच्याकडे दुर्लक्ष करत आहे, असे म्हणत एसटी बसवर दगडफेक केली. तसेच कळंब शहराजवळील कळंब-केज येथील मांजरा पुलावर मराठा समाजाकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. तर रस्त्यावर टायर पेटवून मराठा समाजाने जोरदार घोषणाबाजी केली आहे.

व्यापारी महासंघाकडून मोंढा मार्केट बंद

बीडमध्ये देखील मराठा आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मराठवाडा व्यापारी महासंघाकडून मोंढा मार्केट बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याप्रमाणे मोंढा मार्केट आज पूर्णपणे बंद ठेवून व्यापारी संघटनेने मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा दर्शविला.

सांगलीचे बेडग गाव कडकडीत बंद

राज्यात बंदचे लोन पसरले असतानाच मिरज येथील सकल मराठा समाजाच्या वतीने बेडग गावात गाव बंदची हाक पुकारण्यात आलेली होती. त्यानुसार आज गावातील सर्व व्यवसायासह दुकाने बंद ठेवण्यात आली.

लातूरमध्येही कडकडीत बंद

मनोज जरांगे पाटील यांनी समाजाला आरक्षण मिळावे यासाठी उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या या उपोषणाला पाठिंबा दर्शविण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने आज लातूर बंदची हाक देण्यात आली. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. येथे सकाळपासूनच बाजारपेठेतील अनेक व्यवसायिकांनी आपली दुकाने बंद ठेवली होती. त्याचबरोबर बंद दरम्यान शहरातील अनेक शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय शाळा आणि महाविद्यालय प्रशासनाने घेतला होता.    

बंदची चर्चा मुंबईत

दरम्यान मराठा क्रांती मोर्चा आणि मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीनं मुंबईत जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी चिंतन बैठक बोलवण्यात आली होती.

नांदेडमध्ये समिश्र प्रतिसाद

सकल मराठा समाजाकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. त्याच अनुषंगाने नांदेड येथील मराठा समाज बांधवांनी नांदेड बंदची हाक दिली होती. पण पुकारलेल्या या बंदला नांदेडमध्ये समिश्र प्रतिसाद मिळाला.

नाशिकमध्ये बोंबाबोंब आंदोलन

सकल मराठा समाजाने दिलेल्या बंदच्या हाकेला नाशिकमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला. येथे सकल मराठा समाजाकडून बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले. तसेच सगेसोयरे अध्यादेश कायद्यात रूपांतर करण्याची मागणी करताना जरांगे पाटील यांना काही झाल्यास राज्यात उद्रेक होईल असा इशारा सरकारला देण्यात आला. तर सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture MSP: शनिवारपासून सोयाबीन, मूग, उडीद हमीभावाने खरेदी सुरू!

Weather Update: महाराष्ट्रात कडाक्याची थंडी; उत्तरेकडील जिल्ह्यांत तापमान घसरले

Market Update: सोयाबीनचा दर टिकून, मुगावर दबाव कायम

Solar Pump Scheme: अठरा हजारांवर शेतकऱ्यांना सौरकृषिपंपाची प्रतीक्षा

Post Harvest Management: संत्रा फळाचे काढणीपश्चातचे नुकसान टाळण्यासाठी सोपे उपाय

SCROLL FOR NEXT