(Stemphylium Leaf Blight Disease) : कांद्यावरील स्टेमफायलम (Stemphylium Leaf Blight) करपा हा बुरशीजन्य रोग आहे. त्याच्याविषयी
भारत, अमेरिका व अन्य कांदा उत्पादक देशांत आढळतो.
रोग निर्माण करणारी बुरशी- स्टेमफायलम व्हेसीकॅरियम (Stemphylium vesicarium)
अन्य यजमान पिके : लसूण, टोमॅटो, सोयाबीन, आंबा, शतावरी.
नुकसान- सुमारे ३० ते ५० टक्के नुकसान होऊ शकते.
लक्षणे
कांदा तयार होण्याच्या अवस्थेत हा रोग जास्त दिसून येतो. जुनी पाने रोगाला लवकर बळी पडतात. प्रथम पानाच्या मध्यावर पाणीदार ठिपका दिसतो. लागतो. तो राखाडी रंगाचा व अंडाकार असतो.
ठिपक्यांच्या खालील व वरच्या बाजूला पिवळसर भाग दिसतो. कालांतराने बुरशीचे बीजाणू तयार होतात तेव्हा हा ठिपका काळसर दिसतो. असे अनेक ठिपके हळूहळू पडतात व संपूर्ण पान रोगग्रस्त होऊन गळून पडते. त्यामुळे कांदा व्यवस्थित पोसत नाही व उत्पादन कमी होते. बीजोत्पादनाच्या कांद्यावरही रोग आढळतो. त्यामुळे फुलांचा दांडा पडून नुकसान होते.
रोग कसा निर्माण होतो?
बुरशी तंतूंच्या स्वरूपात जमिनीतील काडी कचरा, सेंद्रिय पदार्थ, पिकांचे अवशेष, जुन्या कांद्याचा ढीग यावर जिवंत किंवा सुप्तावस्थेत राहते. ८० ते ९० टक्के आर्द्रता व २० ते ३० अंश से. तापमानात बुरशीचे बीजाणू (अस्कोस्पोअर्स) तयार होतात. ते हवा, पाणी, कीटक व मजूर यांच्याकरवी कांदा पिकावर प्रसारित होतात.
आर्द्रता जास्त असेल व पान १२ तास ओले राहत असेल किंवा वातावरणात दव असल्यास बीजाणू अंकुरित होऊन रोगाची प्राथमिक लागण करतात. त्यानंतर पानावरील बुरशी बीजाणू निर्माण करतात. त्यास कोनिडिया म्हणतात. त्यापासून द्वितीय लागण होते.
नियंत्रण उपाय
स्ट्रॉबिलीन गटाच्या बुरशी नाशकाप्रति प्रतिकार क्षमता या बुरशीत निर्माण झाली आहे. त्यामुळे
या गटातील बुरशीनाशकांचा वापरू टाळावा.
शेतातील काडी कचरा किंवा जुन्या पिकांचे अवशेष स्वच्छ करावेत.
ट्रायकोडर्माचा वापर लागवडीपूर्वी संपूर्ण शेतात फवारणी किंवा धुरळणी स्वरूपात किंवा शेणखतात मिसळून करावा.
तुषार सिंचनाचा वापर शक्यतो टाळावा.
वारंवार एकच पीक घेणे टाळावे.
लसूण, सोयाबीन, टोमॅटो, कांदा आदी यजमान पिके आधी शेतात घेणे टाळावे.
रोगास अनुकूल वातावरण असल्यास शिफारसीत बुरशीनाशकांचा वापर करावा.
शिफारस केलेली बुरशीनाशके
ॲझॉक्सीस्ट्रॉबीन १८. २ टक्के अधिक डायफेनोकोनॅझोल ११. ४ टक्के एससी (संयुक्त)
टेब्युकोनॅझोल- ३८. ३९ टक्के एससी.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.