Orange Producer Agrowon
ॲग्रो विशेष

Orange Producer : काजळी येथील युवा संत्रा उत्पादक देशमुख यांना राज्यस्तरीय पुरस्कार

Orange Production Update : काजळी येथील युवा संत्रा उत्पादक शेतकरी मयूर देशमुख यांचा उत्कृष्ट संत्रा उत्पादक प्रयोगशील शेतकरी गटातून राज्यस्तरीय राजीव गांधी कृषिरत्न पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

Team Agrowon

Amravati Farmer Award News : काजळी येथील युवा संत्रा उत्पादक शेतकरी मयूर देशमुख यांचा उत्कृष्ट संत्रा उत्पादक प्रयोगशील शेतकरी गटातून राज्यस्तरीय राजीव गांधी कृषिरत्न पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

प्रयोगशील शेतकऱ्यांना थेट बांधावर जात गौरविण्याचा अभिनव उपक्रम यंदा राजीव गांधी कृषिरत्न पुरस्कार समितीच्या वतीने राबविण्यात आला. त्यानुसार काजळी येथे मयूर देशमुख यांच्या शेतातच हा सोहळा पार पडला.

यावेळी अध्यक्षस्थानी दादासाहेब आसरकर, डॉ. दिलीप काळे, नंदू बंड, पौर्णिमा सवाई, प्रकाश सबाळे, अविनाश पांडे, छोटू देशमुख उपस्थित होते.

यावेळी उपस्थितांनी सुरुवातीला मयूर देशमुख यांच्या बागेला भेट देत पाहणी केली. त्याआधारे त्यांच्या प्रयोगशीलतेचे कौतुक करीत त्यांचा सन्मान केला. इतर शेतकऱ्यांनी देखील मयूरचे अनुकरण करावे, असे प्रतिपादन यावेळी प्रकाश साबळे यांनी बोलताना केले.

...यासाठी झाला सन्मान

देशमुख यांनी संत्रा बागेतील मधल्या फांद्यानाही सूर्यप्रकाश मिळावा याकरिता शास्त्रोक्‍त पद्धतीने छाटणीवर भर दिला आहे. त्यामुळेच हंगामात बहराचे योग्य व्यवस्थापन शक्‍य होत असल्याने गुणवत्तापूर्ण फळांच्या उत्पादनात त्यांना सातत्य राखता आले आहे. नियोजनबद्ध छाटणीमुळे प्रकाश संश्‍लेषणाची क्रिया योग्य प्रकारे होत असल्याने झाडाला पुरेसा सूर्यप्रकाश मिळतो.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drought Relief: मराठवाडा दुष्काळग्रस्त जाहीर करून तातडीने मदत द्या

Exam Stress Relief : परीक्षा जवळ आलीये अन् टेन्शन वाढलंय? 'या' सोप्या टिप्सने ताण होईल छुमंतर!

Women Farmers Contribution: मोरोक्कोच्या बहरलेल्या शेतीतील अदृश्य हात

Interview With Rakesh Kaithwas : शेतकरी कंपन्यांच्या बळकटीकरणातून मूल्यवर्धनाला चालना

Bullock Safety Tips: बैलाच्या वजनानुसार बैलगाडीत किती ऊस भरावा?

SCROLL FOR NEXT