PDKV Akola  Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Exhibition : ‘पंदेकृवि’त २७ डिसेंबरपासून राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन

PDKV Akola : निसर्गाच्या लहरीपणावर मात करण्यासाठी आधुनिक शेती व्यवसायातील विविध नावीन्यपूर्ण संधींचे प्रदर्शन या निमित्ताने बघावयास मिळणार आहे.

 गोपाल हागे

Akola News : कृषी क्रांतीचे प्रणेते डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या १२५ व्या जयंती दिनानिमित्त कृषी विद्यापीठात २७ ते २९ डिसेंबर या काळात तीन दिवसीय राज्यस्तरीय ‘ॲग्रोटेक’ कृषी प्रदर्शन, कृषी महोत्सव व चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या समन्वयातून होत असलेल्या या प्रदर्शनाचे उद्‌घाटन बुधवारी (ता. २७) होईल. प्रदर्शन, कृषी महोत्सव व विविध विषयांवरील चर्चासत्रे होत आहेत.

सुमारे चारशेपेक्षा अधिक दालने राहतील. राज्यभरातील विद्यापीठांमध्ये निर्मित प्रगत कृषी तंत्रज्ञान, राज्य शासनाचा कृषी विभाग, जैविक शेती मिशनसह विविध राष्ट्रीय तथा राज्य पातळीवरील शेती आणि ग्रामविकासाशी संबंधित संस्था, कृषी निविष्ठांच्या उत्पादक कंपन्या, यंत्र अवजारे निर्माण करणाऱ्या कंपन्या,

बी-बियाणे खते, कीटकनाशके, सेंद्रिय निविष्ठा आदींच्या उत्पादक कंपन्या यासह कृषी विद्यापीठातून शिक्षणक्रम पूर्ण केलेल्या आणि स्वतः उद्योजक म्हणून सेवारत असणाऱ्या कृषी पदवीधरांची दालने, विदर्भातील स्वंयसहाय्यता बचत गटांच्या माध्यमातून निर्मित कृषी पूरक उत्पादने, व खाद्यपदार्थांचे स्टॉल देखील समाविष्ट आहेत.

निसर्गाच्या लहरीपणावर मात करण्यासाठी आधुनिक शेती व्यवसायातील विविध नावीन्यपूर्ण संधींचे प्रदर्शन या निमित्ताने बघावयास मिळणार आहे. ड्रोन तंत्रज्ञानासह स्वयंचलित यंत्रे -अवजारे, पीक संरक्षणाच्या विविध पद्धती, औषधी व सुगंधी वनस्पतींच्या अनेकानेक जाती, फळे- फुले, रानभाज्यांचे प्रदर्शन लक्षवेधी ठरणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tobacco Farming : जिनेव्हा येथील परिषदेवरून तंबाखू उत्पादकांची संघटना आणि जागतिक आरोग्य संघटनेत वादाची ठिणगी; प्रकरण काय?

Agriculture Entrepreneur: चारा, बेणे विक्रीतून साधले करिअर!

Maharashtra Biodiversity: जैवसंपदा समित्यांना १.५८ कोटींचा निधी

Sugar Exports: देशातून १५ लाख टन साखर निर्यातीला केंद्राकडून हिरवा कंदील, मोलॅसिसवरील निर्यात शुल्कही हटवले

Farmer Welfare: शेती आणि शेतकरी वाचला तरच देश पुढे जाईल

SCROLL FOR NEXT