Cashew Subsidy  Agrowon
ॲग्रो विशेष

Cashew Nut Subsidy: काजू बी अनुदानाचा निधी शेतकऱ्यांना मिळणार; राज्य सरकारची निधीला मान्यता

Cashew subsidy Maharashtra : काजू बी अनुदानासाठी राज्य सरकार २०२४-२५ अर्थसंकल्पातील पुरवण्या मागण्यांमध्ये १० कोटी रुपयांच्या निधी तरतूद केली. त्यापैकी ३.३६ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. तसेच आता १ कोटी ६० लाख रुपयांच्या निधीला मान्यता दिली आहे.

Dhananjay Sanap

Cashew nut subsidy Maharashtra : राज्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी काजू बी अनुदानासाठी राज्य सरकारने १ कोटी ६० लाख ९५ हजार ११० रुपयांचा निधी वितरित करण्यास मान्यता दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय राज्य सरकारने शुक्रवारी (ता.२८) संकेतस्थळावर प्रसिद्ध केला आहे. त्यामुळे काजू बी उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे.

राज्य सरकारने २०२४ च्या काजू हंगामासाठी विक्री केलेल्या काजू बीसाठी प्रति किलो १० रुपयांप्रमाणे ५० किलो व कमाल २००० किलो या मर्यादेत अनुदान जाहीर केलं होतं. या निधीचं वितरण काजू उत्पादक लाभार्थी शेतकऱ्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यावर महाराष्ट्र राज्य काजू मंडळामार्फत जमा करण्यात येणार आहे.

काजू बी अनुदानासाठी राज्य सरकार २०२४-२५ अर्थसंकल्पातील पुरवण्या मागण्यांमध्ये १० कोटी रुपयांच्या निधी तरतूद केली. त्यापैकी ३.३६ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. तसेच आता १ कोटी ६० लाख रुपयांच्या निधीला मान्यता दिली आहे. काजू बी अनुदान प्रलंबित असल्याने शेतकऱ्यांना अडचणीला तोंड द्यावं लागत आहे.

दरम्यान, राज्यात काजू लागवडीखाली सुमारे १.९१ लाख हेक्टर क्षेत्र आहे. प्रामुख्याने कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात काजू पिकाचं उत्पादन घेतलं जातं. यामध्ये सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, पालघर जिल्ह्यांचा समावेश होतो. परंतु काजू बीला हमीभाव मिळत नसल्याने काजू उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली होती. त्यावरून शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Plastic Flower Ban : प्लास्टिक फुलांच्या बंदीबाबत विशेष सूचना काढणार; मुख्यमंत्र्यांनी दिला कडक कारवाईचा इशारा

Rotavator Maintenance: रोटाव्हेटरची योग्य देखभाल कशी करावी? शेतकऱ्यांसाठी सोप्या टिप्स

Fruit Harvesting Tools: फळे काढणीस उपयुक्त आधुनिक साधने

Experimental Farming: तरुणांनी प्रयोगशील शेतीकडे लक्ष द्यावे

Kolhapuri Barrage: कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्यांचे बॅरेजेसमध्ये रूपांतर करा

SCROLL FOR NEXT