ATMA Employees Agrowon
ॲग्रो विशेष

ATMA Employees : राज्याच्या वित्त विभागाला ‘आत्मा’ कर्मचाऱ्यांचे साकडे

State Finance Department : विविध मागण्यांसंदर्भात आत्मा कर्मचाऱ्यांनी संचालकांना आजवर केलेल्या मागण्यांचे निवेदन दिल्यानंतर राज्याच्या वित्त विभागाचे उपसचिव माधव वीर यांना बुधवारी (ता.१८) साकडे घातले.

Team Agrowon

Chhatrapati Sambhajinagar : विविध मागण्यांसंदर्भात आत्मा कर्मचाऱ्यांनी संचालकांना आजवर केलेल्या मागण्यांचे निवेदन दिल्यानंतर राज्याच्या वित्त विभागाचे उपसचिव माधव वीर यांना बुधवारी (ता.१८) साकडे घातले. ‘आत्मा’ अंतर्गत कर्मचाऱ्यांच्या केलेल्या पगार कपातीबाबत शासनस्तरावर सकारात्मक निर्णय घेऊन न्याय देण्यात यावा, अशी कळकळीची विनंती केली आहे.

आत्मा कर्मचाऱ्यांनी विधिमंडळ हिवाळी अधिवेशन काळात राज्याच्या वित्त विभागाचे उपसचिव माधव वीर यांची भेट घेऊन निवेदन दिले. त्यानुसार कृषी विभागातील आत्मा यंत्रणेअंतर्गत कंत्राटी पद्धतीने २०१० पासून कार्यरत आहोत. आत्मा यंत्रणेमुळे राज्यातील शेतकरी उत्पादक कंपन्या आणि गटांच्या माध्यमातून शेतकरी यशस्वी होत आहेत. त्यांच्या उत्पन्न वाढीकरिता आत्मा यंत्रणा उपयोगी पडत आहे.

परंपरागत कृषी विकास योजना-सेंद्रिय शेती, डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन योजना नैसर्गिक शेती, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, स्मार्ट प्रकल्प व स्मार्ट कॉटन योजना, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनांसारख्या अनेक योजना आत्मा यंत्रणेमार्फत राबविल्या जातात. कृषी व कृषी संलग्न तंत्रज्ञानाच्या प्रचार प्रसार करण्याकरिता प्रशिक्षणे, अभ्यास दौरे, शेतीशाळाच्या माध्यमातून लाखो शेतकरी वर्गात कौशल्य निर्माण करण्यात यश आले.

कोरोना काळात सुद्धा आत्मा कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांना मोलाची मदत केली. परंतु आमच्या मागण्यांच्या अनुषंगाने शासन स्तरावर अनेकदा पत्रव्यवहार करूनही, आत्माअंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमितीकरणसह इतर कुठलाही शासकीय लाभ, सेवासुविधा लागू करण्याबाबतच्या निर्णय घेण्यात आलेले नाही. उलट २०२१ पासून ४० टक्के पगार कपात करून आमच्यावर अन्याय केला जात आहे.

विवंचनेला नाही पारावार...

कर्मचाऱ्यांच्या पगार कपातीसह, महिला कर्मचाऱ्यांना प्रसूती रजा, अपघात/वैद्यकीय आणि नैमित्तिक रजा सुद्धा लागू नाहीत. अनेक कर्मचारी मृत्यू पावले असून त्यांना कुठलाही लाभ मिळालेला नाही. त्यांची पारिवारिक परिस्थिती लक्षात घेता संघटनेमार्फत मदतनिधी उभारून त्यांच्या परिवारास मदत करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वांनाच कमालीच्या आर्थिक, पारिवारिक व सामाजिक विवंचनेतून सामोरे जावे लागत असल्याचे आत्मा एम्प्लॉईज वेलफेअर असोसिएशनने स्पष्ट केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Godavari Flood: पुरामुळे गेवराईतील नागरिक अजूनही स्थलांतरितच 

Farmers Protest: पैठण-छत्रपती संभाजीनगर महामार्ग रोखला

Paddy Cultivation: दर्जेदार भात उत्पादनासाठी अन्नद्रव्य व्यवस्थापनावर भर

Karnataka Floods: शेतकऱ्यांना मोठा दिलासा! कर्नाटकात पीक नुकसानीची प्रति हेक्टर ८,५०० रुपये अतिरिक्त भरपाई

Sugarcane Farming: ऊस व्यवस्थापनातील महत्त्वाच्या बाबी 

SCROLL FOR NEXT