Mango Festival Agrowon
ॲग्रो विशेष

Mango Festival: राज्य कृषी पणन मंडळाचा आंबा महोत्सव मंगळवारपासून सुरू

Mango Update: आंबा हंगामात ग्राहकांना अस्सल हापूस उपलब्ध व्हावा, आणि शेतकऱ्यांना रास्त दर मिळावा, या उद्देशाने राज्य कृषी पणन मंडळाच्या वतीने दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या आंबा महोत्सवाला मंगळवारी (ता. १) प्रारंभ होत आहे.

गणेश कोरे

Pune News: आंबा हंगामात ग्राहकांना अस्सल हापूस उपलब्ध व्हावा, आणि शेतकऱ्यांना रास्त दर मिळावा, या उद्देशाने राज्य कृषी पणन मंडळाच्या वतीने दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या आंबा महोत्सवाला मंगळवारी (ता. १) प्रारंभ होत आहे.

मात्र गुढीपाडव्याला ग्राहकांची मागणी वाढल्यामुळे शनिवारी (ता. २९) महोत्सवस्थळी आंब्याची विक्री सुरू झाली आहे. कोकणातून काही शेतकरी दाखल झाले असून, विक्री सुरू केली आहे. महोत्सवात प्रति डझनला साधारण दीड ते दोन हजार रुपये आहेत.

पणन मंडळाच्या वतीने दरवर्षी मार्केट यार्ड बस डेपो शेजारील जिल्हा परिषदेच्या मोकळ्या जागेत आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. या महोत्सवात १०० पेक्षा अधिक स्टॉल लावण्यात आले असून, हा महोत्सव पुढील एक महिना सुरू असणार आहे. महोत्सवात कोकणातील सिंधुदुर्ग.

रत्नागिरी जिल्ह्यांमधून हापूससह केसर आंबा विक्रीसाठी आणला जातो. तसेच पुणे जिल्ह्यातील काही महिला बचत गटाच्या उत्पादन विक्रीसाठी स्टॉल दिले जातात. या वर्षीच्या महोत्सवाला मंगळवारी (ता. १) प्रारंभ होत असला तरी, गुढीपाडव्या निमित्त शनिवार (ता. २९) पासूनच विक्री सुरू झाली आहे.

या ठिकाणी महोत्सवाचे आयोजन

या वर्षी मार्केट यार्डसह कोथरूड (गांधी भवन), खराडी, मगरपट्टा (हडपसर) या ठिकाणी आंबा महोत्सव होणार असल्याचे सुहास काळे यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bhaskar Jadhav In Assembly: शेतकरी आत्महत्या, कृषी योजना आणि खोट्या आश्वासनांवरून जाधवांनी सरकारला धरले धारेवर

Group Farming : गटशेती हा शाश्‍वत शेतीचा प्रभावी पर्याय ठरू शकतो

Parbhani Rainfall : जून महिन्यात सरासरीहून कमी पाऊस

Farmer Aid Cancellation: नैसर्गिक आपत्तीच्या मदतीत कपात, शेतकऱ्यांची फसवणूक; वड्डेटीवारांचा सरकारवर निशाणा

Raj-Udhhav Unity : ठाकरे बंधूंची एकजूट पालिकेतही दिसावी

SCROLL FOR NEXT