Paddy Procurement Agrowon
ॲग्रो विशेष

Paddy Procurement : रब्बी हंगामातील धान खरेदी केंद्र सुरू करा

Paddy Market : उन्हाळी धानाची व कापणी व मळणी जोमात सुरू असताना धान खरेदी केंद्राअभावी शेतकऱ्यांच्या समोर ते विकण्याची समस्या निर्माण झाली आहे.

Team Agrowon

Bhandara News : उन्हाळी धानाची व कापणी व मळणी जोमात सुरू असताना धान खरेदी केंद्राअभावी शेतकऱ्यांच्या समोर ते विकण्याची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे शासनाने त्वरित उन्हाळी धान खरेदी केंद्र सुरू करावे, अशी मागणी राज्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्य सचिव यांच्याकडे केली आहे.

सिंचनाची सोय असलेल्या भंडारा जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी या वर्षी मोठ्या प्रमाणात धान पिकाची लागवड केली आहे. धानपिक कापणी व मळणीला जोमात सुरुवात झाली आहे. अवकाळी पावसाच्या सावटात शेतकरी मिळेल त्या साधनाने शेतीची कामे उरकून घेत आहेत.

उन्हाळी धान खरेदी केंद्र १ मेपासून सुरू होणे अपेक्षित असताना उन्हाळी धान कापणी व मळणी धडाक्यात सुरू असताना देखील शासनाकडून आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू होण्याच्या हालचाली दिसून येत नाहीत. धान खरेदी केंद्राअभावी शेतकऱ्यांची मोठी पंचायत होत आहे.

परिणामी, व्यापाऱ्यांना मिळेल त्या भावात शेतकरी आपला धान विक्री करीत आहे. शासनाच्या या दुटप्पी धोरणामुळे शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. एकीकडे निसर्गाच्या चक्रव्यूहात शेतकरी सापडला असताना शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या देशोधडीला जात आहे.

शासनाच्या या दुटप्पी धोरणामुळे शेतकरी द्विधा मनःस्थितीत सापडला आहे. नैराश्यातून टोकाचे पाऊल उचलीत आहे. आगामी खरीप हंगाम लक्षात घेता शासनाने तत्काळ धान उत्पादक जिल्ह्यात उन्हाळी हंगामातील धान खरेदी केंद्र सुरू करावे, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्याचे मुख्य सचिव डॉ. नितीन करीर यांचेकडे केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी रक्कम वितरणास विलंब का? सहकारमंत्र्यांनी सांगितलं कारण

Mechanized Paddy Transplantation: यंत्राने भात लागवडीकडे वाढता कल

MIDC Long March : एमआयडीसीविरोधात वर्णे ते सातारा ‘लाँग मार्च’

Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांवर सरकारची कारवाई; अनुदानाची वसुली, तुरुंगवासाचीही शक्यता?

Skill Training Centre: मराठवाड्यात सुरू होणार अत्याधुनिक कौशल्य प्रशिक्षण केंद्र

SCROLL FOR NEXT