Chalisgaon Railway Station Agrowon
ॲग्रो विशेष

MP Unmesh Patil : ‘एक स्थानक एक उत्पादन स्टॉल’चा चाळीसगाव रेल्वे स्थानकावर प्रारंभ

खासदार उन्मेश पाटील व उमंग महिला परिवाराच्या संस्थापक अध्यक्षा संपदा पाटील यांच्या हस्ते स्टॉलचा प्रारंभ करण्यात आला.

Team Agrowon

Jalgaon News : ‘वन स्टेशन वन प्रॉडक्ट स्टॉल’ या संकल्पनेतून स्थानिक उत्पादनाला वाव मिळणार आहे. आज स्थानिक उत्पादन केळी वेफर्स (Banana wafers) आणि प्रॉडक्टमुळे रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात देशाची आत्मनिर्भर भारताकडे वाटचाल सुरू आहे, असे प्रतिपादन खासदार उन्मेश पाटील (MP Unmesh Patil) यांनी केले.

येथील रेल्वे स्थानकावरील ‘वन स्टेशन वन प्रॉडक्ट स्टॉल’च्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. सुरुवातीला स्टेशन प्रबंधक एन. पी. बडगुजर यांनी खासदार उन्मेश पाटील यांचे स्वागत केले. खासदार पाटील यांनी सपत्नीक विधिवत पूजन केले.

त्यानंतर खासदार उन्मेश पाटील व उमंग महिला परिवाराच्या संस्थापक अध्यक्षा संपदा पाटील यांच्या हस्ते स्टॉलचा प्रारंभ करण्यात आला. त्यांच्या हस्ते स्टॉलधारक कैलास अहिरे यांचा सत्कार करण्यात आला.

या वेळी ज्येष्ठ नगरसेवक राजेंद्र चौधरी, माजी सभापती संजय पाटील, उपसभापती भाऊसाहेब पाटील, पंचायत समितीचे माजी सदस्य दिनेश बोरसे, पोलिस निरीक्षक शैलेंद्र सिंग, स्टेशन सल्लागार समिती सदस्य विजय बाविस्कर, सामाजिक कार्यकर्ते पद्माकर पाटील, भाजपचे सरचिटणीस अमोल नानकर, शहर सचिव जितेंद्र वाघ, प्रवीण ठोके, राकेश कोतकर, नरेंद्र जैन, समकीत छाजेड, रवींद्र पाटील, प्राचार्य श्री. साळुंखे, उपप्राचार्य एस. एस. काटे, बंडू पगार, व्यापारी आघाडी जिल्हा सचिव अमित सुराणा, अजय वाणी, सुबोध वाघमारे, पराग कुलकर्णी, अमोल मराठे, योगाचार्य मधू कासार, अनिल चव्हाण, विकी चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT