Nitin Gadkari Agrowon
ॲग्रो विशेष

Mother Dairy : परभणीत मदर डेअरीचे दूध संकलन केंद्र सुरू करा

Demand on Swabhimani Shetkari Sanghatana : परभणी येथे मदर डेअरीचे दूध संकलन केंद्र सुरू करण्यात यावे, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची नागपूर येथे भेट घेऊन करण्यात आली.

Team Agrowon

Parbahani News : परभणी जिल्ह्यात शासकीय दूध योजनेअंतर्गत दूध संकलन बंद झाले आहे. जिल्ह्यातील दूध उत्पादकांच्या सोयीसाठी परभणी येथे मदर डेअरीचे दूध संकलन केंद्र सुरू करण्यात यावे, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची नागपूर येथे भेट घेऊन करण्यात आली.

परभणी जिल्ह्यात सध्या एक-दोन खासगी दूध डेअरी आहेत. परंतु दूध संकलनात वाढ झाल्यानंतर ते कमी दराने दूध खरेदी करतात. जिल्ह्याच्या ठिकाणी एकही शीतकरण केंद्र उपलब्ध नाही, त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसगत होत आहे.

मदर डेअरीच्या दूध संकलनासाठी शासकीय दूध योजनेची जागा व प्लांट उपलब्ध आहे. त्यामुळे परभणी जिल्ह्याचा समावेश मदर डेअरीमध्ये केल्यास जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होईल.

कुटुंबाची उपजीविकेसाठी दुग्ध व्यवसायाची संधी उपलब्ध होईल तसेच १०० टक्के हमीभाव व एक चांगली केंद्र सरकारची डेअरी परभणी जिल्ह्यासाठी उपलब्ध होण्यास मदत होईल, अशी मागणीचे निवेदन या वेळी गडकरी यांना देण्यात आले. या वेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर ढगे, रामप्रसाद गमे, मुंजाभाऊ लोडे, एकनाथराव भालेराव, नीलेश साबळे आदी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Monsoon Rain: मराठवाड्यात पावसाचा जोर कमीच; पूर्व विदर्भ आणि कोकणात पुढील ४ दिवस जोरदार पावसाचा अंदाज

Agrowon Podcast: गव्हाचे भाव स्थिरावले; डाळिंब तेजीत, मुग दबावात, केळीच्या दरात वाढ, उडदाचे भाव स्थिर

ZP School Admission : बोराखेडी जिल्हा परिषद शाळेत प्रवेश ‘ॲडमिशन फुल्ल’

Tree Plantation : जैवविविधता जपण्यासाठी वृक्षारोपण गरजेचे

Farmers Welfare: बच्चू कडू यांच्या मागण्यांना सरकारचा सकारात्मक प्रतिसाद; शेतकरी,मजुरांसाठी आश्वासने

SCROLL FOR NEXT