Ringan Agrowon
ॲग्रो विशेष

Ashadhi Wari 2025: माळीनगरात रंगले उभे रिंगण

Sant Tukaram Maharaj Palkhi: रांगोळीच्या पायघड्या अन् जेसीबीतून पुष्पवृष्टी करून संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे माळीनगर येथे बुधवारी (ता. २) मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले.

सुदर्शन सुतार

Solapur News: रांगोळीच्या पायघड्या अन् जेसीबीतून पुष्पवृष्टी करून संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे माळीनगर येथे बुधवारी (ता. २) मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. या सोहळ्याच्या वाटचालीतील पहिले उभे रिंगण सकाळच्या रम्य प्रहरी आल्हाददायी वातावरणात येथे रंगले.

अकलूजचा मुक्काम आटोपून पहाटेपासूनच दिंड्या माळीनगरच्या दिशेने सरकत होत्या. देहू येथून १५ दिवसांपूर्वी निघालेल्या सोहळ्याने आतापर्यंत जवळपास २०० किलोमीटरची वाटचाल केली आहे. त्यामुळे विठुरायाची लागलेली ओढ व पंढरी समीप आल्याचा भाव वैष्णवांच्या चेहऱ्यावर स्पष्ट जाणवत होता.

सकाळी सव्वाआठ वाजता सोहळा माळीनगर हद्दीत दाखल झाला. टाळ-मृदंगचा निनाद आसमंतात दुमदुमत होता. मुखी हरिनाम घेत तल्लीन होऊन वारकरी अभंग आळवीत होते. आकाशात ढगांची दाटी झाली होती. त्यामुळे बुधवारी सकाळपासून सूर्यदर्शन झालेच नव्हते. मंद हळुवार वाऱ्याची झुळूक सुरू होती. या वातावरणात किंचितसा उकाडा जाणवत होता, अशातच उंच फडफडणाऱ्या डौलदार केशरी पताका शोभून दिसत होत्या.

माळीनगर पेट्रोलपंपाजवळ तर रथ लुमेवाडी रस्त्याजवळ मुख्य मार्गावर रिंगणासाठी विसावला. चोपदारांनी रिंगण व्यवस्थेची पाहणी केली. चोपदारांच्या सूचनेनुसार रथाच्या पुढे व मागे पाऊण किलोमीटरपर्यंत वारकऱ्यांनी दुतर्फा रांगा केल्या. प्रारंभी अश्वांची पूजा झाली. चोपदारांनी चोप उंचावून रिंगणास अनुमती दिल्यावर पहिल्यांदा बाभूळगावकरांचा अश्व रथाच्या दिशेने धावला. त्यानंतर पाच मिनिटांनी मोहिते पाटलांच्या स्वार आरूढ असलेल्या ‘बलराज’ अश्वाने दौड मारली.

त्यानंतर दोन्ही अश्वांनी रथाच्या मागून दौड मारत रिंगण पूर्ण केले. दोन्ही अश्व तुकोबांच्या चरणी लीन झाले. ‘याची देही, याची डोळा’ रिंगण अनुभवल्याने वारकऱ्यांच्या आनंदाला उधाण आले होते. रिंगण समाप्तीनंतर वारकरी देहभान विसरून झिम्मा-फुगडी, उडीच्या खेळात दंग झाले. या वेळी सासवड माळी शुगर फॅक्टरीचे पूर्णवेळ संचालक गणेश इनामके व त्यांच्या पत्नी भारती इनामके यांच्या हस्ते पादुकांची विधिवत पूजा करण्यात आली. त्यानंतर समाजआरती झाली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT