Ashadhi Wari 2025 : अहिल्यानगरमध्ये आषाढी एकादशीसाठी चारशे बसगाड्या

MSRTC Group Booking : अहिल्यानगर येथील तारकपुर बसस्थानकातूनच सर्व गाड्या सुटणार असल्याचे महामंडळाच्या विभाग नियंत्रक कार्यालयातून सांगण्यात आले. पंढरपूर येथे ६ जुलै रोजी आषाढी यात्रा आहे.
MSRTC Bus
MSRTC BusAgrowon
Published on
Updated on

Ahilyanagar News : पंढरपूर येथे होत असलेल्या आषाढी एकादशी यात्रेसाठी अहिल्यानगर जिल्ह्यातील भाविकांची संख्या पाहता चारशे बसगाड्याचे नियोजन केले आहे. अहिल्यानगर येथील तारकपुर बसस्थानकातूनच सर्व गाड्या सुटणार असल्याचे महामंडळाच्या विभाग नियंत्रक कार्यालयातून सांगण्यात आले.

पंढरपूर येथे ६ जुलै रोजी आषाढी यात्रा आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातून या यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे बसगाड्याचे नियोजन केले जाते. यात्रेला अजून आठ दिवसाचा कालावधी असला तरी भाविकांचा पंढरपूरकडे ओघ सुरु झाल्याने गाड्या सुरु करण्यात आल्या आहेत. अहिल्यानगर विभागाने जिल्ह्यातून ४०० बसेसची व्यवस्था केली आहे.

MSRTC Bus
Ashadhi Wari 2025 : आषाढी यात्रेसाठी ५२०० विशेष बसेस

यामध्ये नगर विभागाच्या २५०, तर बाहेरील विभागातील १५० बसचा समावेश आहे. जिल्ह्यामध्ये तारकपूर आगारातून ४०, पाथर्डी आगारातून २०, शेवगाव आगारातून २०, पारनेर आगारातून १६, नेवासे आगारातून १६, कोपरगाव आगारातून ३०, अकोला आगारातून १३, संगमनेर आगारातून २५, श्रीगोंदे आगारातून ३०, श्रीरामपूर आगारातून २२ व जामखेड आगारातून १८ गाड्याची विशेष नियोजन केले आहे.

MSRTC Bus
Ashadhi Wari 2025 : माऊलींच्या पालखी सोहळ्याचा बरडला मुक्काम

अहिल्यानगर शहरात तारकपूर, माळीवाडा व पुणे अशी तीन बसस्थानके आहेत. भाविकांची गर्दी व गैरसोय होवू नये म्हणून पंढरपूरला जाण्यासाठी केवळ तारकपूर आगारातूनच बसेस सोडण्याचे नियोजन केले आहे. आषाढी वारीसाठी विशेष सेवा एसटी महामंडळाने सुरू केली आहे. यामध्ये गावातील ४० पेक्षा अधिक जणांनी ग्रुप बुकिंग केल्यास गावातून किंवा परिसरातून पंढरपूरला जाण्यासाठी आणि येण्यासाठी एसटी बस उपलब्ध होणार आहे.

यासाठी गावकऱ्यांना एसटी महामंडळाच्या संकेतस्थळावरही बुकिंगची सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे, तसेच वारी काळात ७५ वर्षांपुढील ज्येष्ठांना मोफत प्रवास देणारी अमृत ज्येष्ठ नागरिक योजना, तसेच महिलांना तिकीट दरात ५० टक्के सुट देणारी महिला सन्मान योजना यासारख्या योजना लागू राहणार आहेत. यात्रेच्या काळात बंद पडणाऱ्या एसटी बसच्या दुरुस्तीसाठी महामंडळाच्या वतीने दुरुस्ती पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. हे पथक कर्जत तालुक्यातील माहीजळगाव येथे कार्यरत राहणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com