Shirur Tehsil Office Agrowon
ॲग्रो विशेष

Shirur Tehsil Vacant Post : शिरूर तहसील कार्यालयात १३ पदे रिक्त; प्रशासनासमोरील आव्हान वाढले!

Staff Shortage : शिरूर तहसील कार्यालयात महसूल सहाय्यक, अव्वल कारकून यांची तब्बल १३ पदे रिक्त आहेत. मोजक्या कर्मचाऱ्यांकडून शिरूर तालुक्याचा गाडा हाकला जात आहे.

Team Agrowon

Pune News : शिरूर तहसील कार्यालयात महसूल सहाय्यक, अव्वल कारकून यांची तब्बल १३ पदे रिक्त आहेत. मोजक्या कर्मचाऱ्यांकडून शिरूर तालुक्याचा गाडा हाकला जात आहे. तालुकाभरातून आलेल्या प्रकरणांचा निपटारा करणे रिक्त पदांमुळे अडचणीचे बनले आहे.

लवकरात लवकर उचित कार्यवाही करून ही पदे तातडीने भरण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. शिरूर तहसील कार्यालयामध्ये महसूल सहाय्यक व अव्वल कारकून यांची अनेक पदे रिक्त आहे.

एकीकडे काही भ्रष्ट कर्मचाऱ्यांमुळे जनतेची होणारी ससेहोलपट, तर दुसरीकडे मोठ्या प्रमाणात जागा रिक्त असल्याने व काही अधिकाऱ्यांवर अतिरिक्त कार्यभार असल्याने सर्वसामान्य नागरिक शेतकऱ्यांना मात्र तहसील कार्यालयात चकरा माराव्या लागत आहेत. यातून नागरिकांचे मानसिक, शारीरिक, आर्थिक नुकसान होत आहे.

रिक्त जागांचा तपशील

महसूल सहाय्यक यांची एकूण मंजूर पदे १७ असून, कार्यरत पदे ७ आहेत. तर १० पदे रिक्त आहेत. अव्वल कारकून यांची एकूण मंजूर पदे ९ आहेत, तर कार्यरत पदे ७ आहेत. रिक्त पदे २ दोन आहेत. मंडल अधिकारी यांची मंजूर पदे १० आहेत. कार्यरत पदे ९, तर रिक्त पद १ आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

MPKV Controversy: बनावट कागदपत्रांची तक्रार करणाऱ्या प्राध्यापकाचीच चौकशी

Pune APMC: पुणे बाजार समितीमधील सेस गळती रोखणार

Solapur APMC Security: सोलापूरच्या सिद्धेश्वर बाजार समितीत अधिकारी-कर्मचाऱ्यांना ‘वॅाकीटॅाकी’

Agriculture Officer Transfer Issue: बदलीनंतरही रुजू न झालेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई नाही

Himachal Pradesh Rain: मुसळधार पावसामुळे हिमाचलमध्ये २५० रस्ते बंद

SCROLL FOR NEXT