Disaster Management : आपत्ती व्यवस्थापनासाठी ३०० आपदा मित्रांना प्रशिक्षण
Buldana News : राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या संकल्पनेतून संपूर्ण देशभरात आपदा मित्र ही योजना राबवण्यात येत आहे. यासाठी बुलडाणा जिल्ह्यातील ३०० आपदा मित्र प्रशिक्षणासाठी निवड करण्यात येणार आहे. आपदा मित्र प्रशिक्षणासाठी इच्छुक युवक-युवतींनी गुगल लिंकवर नाव नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापान प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी यांनी केले आहे.
स्थानिक स्तरावर उद्भवणाऱ्या आपत्तींना तत्काळ प्रतिसाद देण्याकरिता स्थानिक लोकांना आपत्ती व्यवस्थापन विषयक प्रशिक्षण देऊन सक्षम करणे हे या योजनेचे मूळ उदिष्ट आहे. या योजनेच्या माध्यमातून जीवितहानी कमी करणे, समाजात आपत्ती व्यवथापन विषयक जनजागृती करणे व आपत्तीला प्राथमिक स्तरावर प्रतिसाद देण्याकरिता मनुष्यबळ तयार करणे अशा अनेक बाबी साध्य होणार आहेत.
राज्य शासनाने १६ जिल्ह्यांत राज्य शासनांमार्फत आपदा मित्र प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्याबाबत मान्यता दिली आहे. त्यानुसार बुलडाणा जिल्ह्यात ३०० आपदा मित्र प्रशिक्षणासाठी तयार करण्यात येणार आहेत. या आपदा मित्रांना शासनाकडून निवड करण्यात येणाऱ्या यंत्रणेमार्फत आपत्ती व्यवस्थापन विषयांबाबत १२ दिवसांचे निवासी प्रशिक्षण देण्यात येईल.
प्रशिक्षणाकरिता वय वर्षे १८ ते ४५ या गटातील सक्षम असलेल्या सामान्य नागरिक, महाविद्यालयीन विद्यार्थी, अशासकीय संघटना (एनजीओ), अशा वर्कर्स, अगणवाडी सेविका, शासकीय व निमशासकीय कर्मचारी इत्यादी यांचा समावेश असेल. तथापि, डॉक्टर, माजी सैनिक, स्थापत्य अभियंता यांच्याकरिता वयोमर्यादा ५५ वर्षांपर्यंत राहील (मात्र त्यांना अपघात विमा सुविधा अनुज्ञेय राहणार नाही.) सदर नोंदणी करताना इच्छुक महिलांचा समावेश करण्याबाबतही नमूद आहे.
या प्रशिक्षण कार्यक्रमात सहभाग नोंदविणाऱ्या आपदा मित्रांना विहित करण्यात आलेले प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर शासनाकडून तीन वर्षांकरिता आपत्ती समयी शोध व बचाव कार्य करताना अपघात झाल्यास पाच लाख मर्यादेत अपघात विमा तसेच वैयक्तिक आपत्कालीन प्रतिसाद कर्ता संच पुरविण्यात येईल.
याकरिता जिल्ह्यातील इच्छुक युवक-युवती, महिला, पुरुष, स्वंयसेवक यांनी संबंधित तहसील कार्यालयात नैसर्गिक आपत्ती विभागाशी संपर्क करून आपली नोंदणी करावी. अधिक माहितीकरिता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागास ७०२०४३५९५४/९०११७७७२२३ या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधून https://docs.google.com/spreadsheets/d/१rNaSbpt१wQiQdH९bVp३naEKs३miCHs९v३Se५xw/edit०usp=sharing या गुगल लिंकवर संपूर्ण माहिती भरावी. ही माहिती २२ जानेवारीपर्यंत जिल्हा नियंत्रण कक्ष, buldhanaddmo@gmail.com किंवा rdc_buldhana@rediffmail.com या ई-मेल आयडीवर पाठविण्यात यावी.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.