Rabi Sowing : रब्बी हंगामातील पेरणी क्षेत्रात २६ हजार हेक्टरने वाढ

Rabi Season : यंदाच्या रब्बी हंगामातील पेरणी आटोपली असून जिल्ह्यात सरासरी पेरणी क्षेत्राच्या तुलनेत ११८ टक्के क्षेत्र पेरणीखाली आले आहे.
Sowing
Rabi SowingAgrowon
Published on
Updated on

Amaravati News : यंदाच्या रब्बी हंगामातील पेरणी आटोपली असून जिल्ह्यात सरासरी पेरणी क्षेत्राच्या तुलनेत ११८ टक्के क्षेत्र पेरणीखाली आले आहे. यामध्ये सर्वाधिक ७५ टक्के पेरणीची सरासरी हरभऱ्याची असून ३५ टक्के क्षेत्रात हरभऱ्याची पेरणी झाली आहे. यंदा हरभऱ्याचे पेरणी क्षेत्र बघता चण्याचे उत्पादन अधिक होण्याचा अंदाज आहे.

गहू व हरभरा ही रब्बी हंगामातील मुख्य पिके असून त्यासोबतच कांदा, मका, ज्वारी, भाजीपाल्याची पेरणी झाली आहे. पावसाळ्यात झालेल्या पावसामुळे यंदा सिंचनासाठी पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. धरणांमध्ये जलसाठा पर्याप्त असल्याने पिकांना पाच पाळ्या पाणी सिंचनासाठी मिळू शकणार आहे.

Sowing
Rabi Sowing : अहिल्यानगरमध्ये रब्बी पेरणी सरासरीपेक्षा कमी

जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी सरासरी १ लाख ४८ हजार ८७९ हेक्टर क्षेत्र असून त्या तुलनेत १ लाख ७५ हजार ६७१ हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली आहे. २६ हजार ७९२ हेक्टर क्षेत्राची वाढ झाली आहे.

Sowing
Maize Chana Rabi Sowing : मक्याच्या लागवड मोठी वाढ; शेतकऱ्यांची हरभरा आणि गव्हालाही चांगली पसंती

गव्हाची ५२ हजार ३८९ हेक्टरमध्ये तर, हरभऱ्याची १ लाख १२ हजार ११२ हेक्टरमध्ये पेरणी झाली आहे. सरासरी पेरणीच्या तुलनेत गव्हाने ३५ टक्के तर, हरभऱ्याने ७५ टक्के क्षेत्र व्यापले आहे. रब्बी ज्वारी ४२९ हेक्टरमध्ये असून २८४२ हेक्टरमध्ये मका असून ४५०४ हेक्टरमध्ये कांदा पेरण्यात आला आहे.

गळीत धान्याकडे पाठ

मोहरी, तीळ, जवस, भुईमूग व सूर्यफूल या गळीत धान्याकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे. कधी काळी जिल्ह्यात सूर्यफुलाचे विक्रमी उत्पादन घेतले जात होते. त्याची पेरणी शून्य आहे. तर भुईमूग १९२ हेक्टर, तीळ ३, जवस ७ व मोहरी या पिकाची पेरणी १४३ हेक्टरमध्ये आहे. गळीत धान्याखाली जिल्ह्यातील केवळ ३४४ हेक्टर क्षेत्र आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com