ST Bus Ticket Fare Hike agrowon
ॲग्रो विशेष

ST Bus Ticket Fare Hike : एसटी बसचा प्रवास महागला; १४.९७ टक्के भाडेवाढीचा निर्णय, सामान्यांच्या खिशाला कात्री

Pratap Sarnaik : राज्य परिवहन महामंडळाकडून (एसटी बस) तिकीट दरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तिकीट दरात तब्बल १४.९७ टक्के भाडेवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला.

sandeep Shirguppe

ST Bus Ticket Maharashtra : प्रवाशांच्या सेवेसाठी म्हणून ओळख असलेल्या राज्य परिवहन महामंडळाकडून (एसटी बस) तिकीट दरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तिकीट दरात तब्बल १४.९७ टक्के भाडेवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. ही दरवाढ १ फेब्रुवारीपासून लागू होणार असल्याची माहिती परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. यामुळे लालपरीचा प्रवास महागणार आहे.

एसटी बसेससोबतच रिक्षा आणि टॅक्सीच्या भाडेवाढीलाही मान्यता देण्यात आली आहे. रिक्षा आणि ट्रक्सीच्या दरात प्रतिकिलोमीटर ३ रुपयांची वाढ होणार आहे. रिक्षा आणि टॅक्सीचीही भाडेवाढ १ फेब्रुवारीपासून लागू होणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य परिवहन प्राधिकरणाची बैठक गुरूवारी (ता.२३) मंत्रालयात पार पडली.

याबाबत परिवहनमंत्री "एसटीची भाडेवाढ मागील काही वर्षांपासून प्रलंबित होती. डिझेलचे दर वाढत असल्याने भाडेवाढ होणे अपेक्षित होते. मात्र मागील ३ ते ४ वर्षांपासून एसटीची भाडेवाढ झाली नव्हती. त्यामुळे आता एकत्रित १४.९७ टक्के इतकीभाडेवाढ करण्यात आली आहे. तसेच रिक्षाचे किमान भाडे २३ रुपयांहून २६ रुपये इतके होणार असून टॅक्सीचे किमान भाडे २८ रुपयांहून ३१ रुपये इतके होणार आहे." अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

"सध्या परिवहन मंत्र्यांचा कार्यभार घेऊन एक महिना होत आला आहे. एकंदरीत अभ्यास केला असता एसटीची भाडेवाढ होणे अपेक्षित होते. या भाडेवाढीमुळे सामान्यांच्या खिशाला फटका जरी बसणार असला तरी एसटी महामंडळात भाडेवाढ झाल्यानंतर आर्थिक स्थिती सुधारणार आहे. १४ हजार ३०० बसेस आणि ८७ हजार कामगार या महामंडळात काम करतात यामुळे यांच्या भविष्याचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे". असे परिवहन मंत्री सरनाईक म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Cotton Rate : कापूस आणि सोयाबीन खरेदीवरून पणनमंत्र्यांना धरले धारेवर; वडेट्टीवारांचे घणाघाती आरोप, तर सत्ताधारी आमदार संतापले

Edible Oil Mission: राष्ट्रीय खाद्यतेल अभियान अंतर्गत तिळाचे प्रमाणित बियाणे मिळणार

Fake Fertilizer: गेवराईत खतप्रकरणी कारवाई, गुन्हा दाखल; कृषी विभागाची माहिती

Soybean Procurement: सोयाबीन खरेदीसाठी 'चिरीमिरी' द्यावी लागते; शेतकऱ्यांची फसवणूक, रणधीर सावरकरांचा गंभीर आरोप

Soybean Procurement: सोयाबीन खरेदीला बीड,छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रतिसाद

SCROLL FOR NEXT