
Grape growing farmer Sangli : द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांकडून केली जाणारी फसवणूक टाळण्यासाठी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयाने तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यात द्राक्ष खरेदीसाठी येणाऱ्या व्यापाऱ्यांची द्राक्ष बागायतदार संघ, बाजार समितीकडे नोंदणी करावी. त्यांनी व्यापाऱ्यांना क्यू-आर कोड द्यावा. तो तपासून शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांशी व्यवहार करावा. फसवणूक टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी दक्ष राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केले.
जिल्हाधिकारी दयानिधी म्हणाले की, "पुढील आठवड्यापासून द्राक्षाचा हंगाम जोर धरण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी निर्यातीसाठीची द्राक्षे विकली जात आहेत. दिल्ली बाजारात जाणारी द्राक्षे काढली जात आहेत. आठ-दहा दिवसांत हंगामाला गती येणार आहे. देशभरातील व्यापारी सांगलीत दाखल होतील व शेतकऱ्यांच्या बांधावर जातील. काही नवे व्यापारी आहेत, काही जुने असतील. या व्यापाऱ्यांनी आपली नोंदणी बाजार समितीकडे करणे गरजेचे आहे. फसवणूक टाळण्यासाठी हे आवश्यक आहे". अशा सूचनाही जिल्हाधिकारी दयानिधी यांनी दिल्या.
शिवाय, कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टिने आपण दक्षता घेणार आहोत. परराज्यातून येणाऱ्या टोळ्यांची माहिती असायला हवी. शेतकऱ्यांनीही ती काळजी घ्यावी. किमान आधारकार्ड, मोबाईल क्रमांक घ्यावा. आधारकार्ड खरे असल्याची खात्री करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.
"बाजार समिती आणि द्राक्ष संघाने याबाबत दक्षता घेण्यासाठी पुढाकार घ्यावा. शेतकऱ्यांना सावध करावे. उधार व्यवहार करताना पूर्ण खात्री आवश्य करावी. फसवणूक झाल्यानंतर जागे होऊ नये. त्याआधी सावध व्हावे. आम्ही ‘क्यू-आर कोड’व्दारे त्या व्यापाऱ्यांच्या नोंदी करीत आहोत. शेतकऱ्यांनी स्थानिकांच्या मदतीने त्या क्यूआर कोडची खात्री करून घ्यावी आणि मग व्यवहार करावेत. जेणेकरून आर्थिक फसवणूक टाळता येईल." असे जिल्हाधिकारी म्हणाले.
जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी म्हणाले, "द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची फसणवूक टाळण्यासाठी एक व्यापक निर्णय आवश्यक आहे. तो कायदेशीर पद्धतीने घेण्याबाबत आम्ही विचार करत आहोत. त्यात शेतकऱ्यांची मदत आवश्यक असेल."
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.