Agriculture Drone Agrowon
ॲग्रो विशेष

Drone Spraying : पंचवीस हजार एकरांवर होणार ड्रोनद्वारे फवारणी

Agriculture Drone : फवारणीसाठीचा वेळ आणि श्रमात बचत व्हावी त्यासोबतच फवारणीदरम्यान होणाऱ्या विषबाधांवर नियंत्रणाच्या उद्देशाने ड्रोनच्या माध्यमातून पिकावर फवारणीला प्रोत्साहन दिले जात आहे.

Team Agrowon

Yavatmal News : फवारणीसाठीचा वेळ आणि श्रमात बचत व्हावी त्यासोबतच फवारणीदरम्यान होणाऱ्या विषबाधांवर नियंत्रणाच्या उद्देशाने ड्रोनच्या माध्यमातून पिकावर फवारणीला प्रोत्साहन दिले जात आहे. त्या अंतर्गत यवतमाळ जिल्ह्यात महिला गटातील सदस्यांना पायलट परवाना देत १०० टक्‍के अनुदानावर १६ ड्रोनचा पुरवठा करण्यात आला आहे.

दरम्यान, होणाऱ्या विषबाधांवर नियंत्रण त्यासोबतच फवारणीसाठी लागणाऱ्या श्रम आणि वेळेची बचत व्हावी या उद्देशाने केंद्र सरकार स्तरावरुन ड्रोनद्वारे फवारणीला प्रोत्साहन दिले जात आहे. त्याकरिता ‘इफ्को’ला जिल्हानिहाय फवारणी क्षेत्रासाठीचे उद्दिष्टही निश्‍चित करून देण्यात आले आहे. त्यानुसार यवतमाळ जिल्ह्यात २५ हजार एकरांवर ड्रोनच्या माध्यमातून कीटकनाशकाची फवारणी होईल.

त्याकरिता महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत (मविम) प्रत्येक तालुक्‍याला स्थापित फेडरेशन लोकसंचालित साधन केंद्र (कम्युनिटी मॅनेज रिसोर्स सेंटर) यांना १०० टक्‍के अनुदानावर प्रत्येकी एक याप्रमाणे १६ ड्रोनचा पुरवठा करण्यात आला आहे. बचत गटातील एका महिलेची निवड ड्रोन पायलट प्रशिक्षणाकरिता करण्यात आली.

त्यांना पुणे येथील डीजीसीआय (नागरी विमान वाहतूक महासंचालनालय) मार्फत सात दिवसांचे प्रशिक्षण व नंतर ड्रोन चालविण्यासाठी पूरक परवाना देण्यात आला. याच महिलांचे नंतर यवतमाळ केव्हीकेला तीन दिवसांचे प्रशिक्षण पार पडले.

ड्रोन पायलट महिलेला समूह साधन केंद्राच्या माध्यमातून पाच हजार रुपये मानधन, प्रवास खर्च १००० रुपये तसेच एकूण उत्पन्नाच्या २ टक्‍के इन्सेटिव्ह दिला जाणार आहे. ‘इफ्को’साठी फवारणीचा दर प्रति एकर ५०० रुपये प्रति असा आहे. त्यातील ४०० रुपये शेतकरी तर ‘इफ्को’ १०० रुपयांचा वाटा उचलणार आहे.
- डॉ. रंजन वानखेडे, वरिष्ठ जिल्हा समन्वय अधिकारी, महिला आर्थिक विकास महामंडळ

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Compensation: सातारा जिल्ह्यातील ७८२ शेतकऱ्यांना दिलासा, अवकाळीने झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीपोटी मदत मंजूर

Illegal Cotton Seeds: अमरावतीत ८.०५ लाखांचा अवैध बियाण्यांचा साठा जप्त

Fertilizer Shop License Suspension: भंडारा जिल्ह्यातील ३६ खत विक्रेत्यांचे परवाने निलंबित

Fertilizer Price: खताची जादा दराने विक्री केल्यास दंडात्मक कारवाई : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Raghav Chadha: राघव चड्ढांसह 'आप'च्या ७ खासदारांचा 'भाजप'च्या यादीत समावेश, राज्यसभेतील 'एनडीए'चे संख्याबळ १४० पार

SCROLL FOR NEXT