Rain Update  Agrowon
ॲग्रो विशेष

Rain Update : पुणे शहरात तुरळक ठिकाणी पावसाची हजेरी

Pune Rain News : उन्हाच्या झळा तीव्र होत असताना जिल्ह्यातील हवामानात चांगलेच बदल दिसून येत आहेत.

Team Agrowon

Pune News : उन्हाच्या झळा तीव्र होत असताना जिल्ह्यातील हवामानात चांगलेच बदल दिसून येत आहेत. कधी ढगाळ वातावरण तर कधी कमाल तापमानाचा पारा चांगलाच वाढत आहे.

शनिवारी (ता. ३०) रात्री अचानक पुणे शहरात ढगाळ वातावरण तयार होऊन सिंहगड रोड, बाणेर, कर्वे पुतळा, कोथरूड भागात पाऊस पडला. तर उर्वरित भागात उकाडा कायम राहिला.

पुणे शहरात कमाल तापमानाचा पारा चांगलाच वाढला आहे. परंतु अचानक होत असलेल्या पावसामुळे पिकांचे नुकसान होण्याच्या भीतीने शेतकरी धास्तावले आहेत. गेल्या महिन्यापासून उन्हाचा चटका वाढत आहे.

त्यामुळे पाण्याची टंचाई भासण्यास सुरवात झाल्याने धरणातील पाण्याची मागणी वाढू लागली आहे. त्यातच अनेक ठिकाणी पिके काढणीच्या अवस्थेत आली आहेत. काही ठिकाणी गहू, हरभरा, ज्वारी अशा पिकांच्या काढणीस सुरवात झाली आहे.

शेतकऱ्यांना धास्ती

मागील दोन ते तीन दिवसांपासून वातावरणात अचानक बदल होण्यास सुरवात झाली आहे. जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. तर शुक्रवारी (ता. २९) सकाळपासून ढगाळ वातावरणाची स्थिती कायम आहे. यामुळे गहू, मका, हरभरा, द्राक्षे, डाळिंब पिकांचे काही प्रमाणात नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांना आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिणींना दोन हप्ते एकदम?; मार्च, एप्रिलचा ७३० कोटी निधी मंजूर

Soybean Seed Treatment: कमी पावसाच्या संकटात सोयाबीन लागवडीपूर्वीचे नियोजन कसे करावे?

Papaya Cultivation: पपई लागवड क्षेत्र १५ हजार हेक्टरवर पोहोचण्याचा अंदाज

Agrowon Podcast: कापसातील तेजी कायम; सोयाबीनमध्ये सुधारणा, कांदा दबावातच तर हळद-हरभरा स्थिर

Water Levels Drop: उन्हामुळे जलसाठ्यात झपाट्याने घट

SCROLL FOR NEXT