Cooperative Spinning Mills Agrowon
ॲग्रो विशेष

Cooperative Spinning Mill : सरकारच्या आर्थिक मदतीशिवाय सूत गिरण्या तग धरणार नाहीत

Team Agrowon

Solapur News : सध्या सूत गिरणी चालवणे जिकिरीचे झाले आहे. सहकारी सूत गिरण्या चालल्या पाहिजेत, ही भूमिका केंद्र व राज्य शासनाने घेतल्याशिवाय तसेच सहकारी सूत गिरण्यांना आर्थिक मदत केल्याशिवाय हा उद्योग यापुढील काळात तग धरू शकणार नाही, असे मत भाई गणपतराव देशमुख शेतकरी सहकारी सूत गिरणीचे अध्यक्ष डॉ. प्रभाकर माळी यांनी व्यक्त केले.

शेतकरी सहकारी सूत गिरणीची ४४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा सूतगिरणी कार्यस्थळावर घेण्यात आली. या वार्षिक सभेत सूतगिरणीचे अध्यक्ष डॉ. माळी बोलत होते.

या सभेसाठी रतनकाकी देशमुख, उपाध्यक्ष नितीन गव्हाणे, माजी अध्यक्ष प्रा. नानासाहेब लिगाडे, शेकापचे तालुका चिटणीस दादा बाबर, विठ्ठलराव शिंदे, खरेदी- विक्री संघाचे अध्यक्ष रमेश जाधव, औद्योगिक वसाहतीचे चेअरमन अरुण पाटील, माजी सभापती बाळासाहेब काटकर, मारुती बनकर, नवनाथ पवार, सुरेश माळी, किशोर बनसोडे, माजी जिल्हा परिषद सदस्य ॲड. सचिन देशमुख, संगम धांडोरे, लक्ष्मण माळी उपस्थित होते.

डॉ. माळी यांनी आपल्या भाषणात संस्थेच्या कामकाजाचा आढावा सभेपुढे सादर केला. सहकारी सूत गिरण्या उभारणीचे राज्य शासनाचे धोरण व वाटचाल याची सभेत माहिती देऊन मागील ६-७ वर्षांपासून वस्त्रोद्योगात निर्माण झालेली अनिश्‍चितता, राज्य व केंद्र सरकारचे वस्त्रोद्योग बाबतचे धोरण, सध्याची या उद्योगाची परिस्थिती याची माहिती सभेत दिली.

सुमारे पाच कोटींचा तोटा

शेतकरी सहकारी सूतगिरणीची सन २०२२-२३ या अहवाल सालाती उलाढालीची महिती देताना अध्यक्ष श्री. माळी यांनी एकूण उलाढाल, नफा याची माहिती सांगताना, गिरणीला या वर्षी सुमारे ४ कोटी ८६ लाख २२ हजार तोटा झाला आहे, अशी माहिती दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Spices Industry : मसाले उद्योगात ‘सुजलाम्’ची भरारी

Agriculture Warehouse : शास्त्रशुद्ध पद्धतीने गोदाम उभारणीचे नियोजन

Fraud of Farmers : फसवणूक टाळण्याचा कायदेशीर मार्ग

Retreating Monsoon : परतीचा पाऊस -हवी अधिक स्पष्टता

PDKV : ‘पंदेकृवि’चा चेहरामोहरा बदलतोय

SCROLL FOR NEXT