Onion Harvesting Agrowon
ॲग्रो विशेष

Onion Harvesting In Khandesh : खानदेशात कांदा काढणीला वेग

खानदेशात कांदा काढणीला वेग आला आहे. उत्पादन एकरी १०० ते ११० क्विंटलपर्यंत येत आहे. उत्पादन काही शेतकरी अधिक मिळवित आहेत.

Team Agrowon

Jalgaon Agriculture News : खानदेशात कांदा काढणीला (onion Harvesting) वेग आला आहे. उत्पादन एकरी १०० ते ११० क्विंटलपर्यंत येत आहे. उत्पादन काही शेतकरी अधिक मिळवित आहेत. पण दर समाधानकारक नाहीत.

पावसाळी वातावरणातही कांदा काढणी खानदेशात सुरू होती. डिसेंबरमध्ये लागवड केलेल्या कांद्याची काढणी सुरू आहे. तर जानेवारी व जानेवारीच्या मध्यात लागवड केलेल्या कांद्याची काढणी पुढील आठवड्यात सुरू होईल. उष्णता असल्याने मजूरटंचाईदेखील आहे.

काढणीसाठी एकरी पाच ते साडेपाच हजार रुपये खर्च किमान येत आहे. जळगाव जिल्ह्यात यंदा सुमारे अडीच हजार हेक्टरवर कांदा लागवड झाली होती. तसेच धुळे व नंदुरबारात मिळून सुमारे पाच हजार हेक्टरवर कांदा पीक होते. लागवड अपेक्षेपेक्षा कमी झाली. परंतु दर कमीच आहेत.

जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक लागवड यावल, चोपडा, जळगाव, धरणगाव, एरंडोल, चाळीसगाव आदी भागात झाली होती. तसेच धुळ्यात साक्री, धुळे तालुक्यात अधिकची लागवड झाली होती.

नंदुरबार तालुक्यात नंदुरबार व नवापुरात कांदा लागवड बऱ्यापैकी झाली होती. कांदा लागवडीच्या वेळेसही कांदा दर कमी होते व आता काढणी सुरू झालेली असतानादेखील दर कमी आहेत.

अनेकांना उत्पादन खर्च वजा करून कांदा पीक परवडत नसल्याचे दिसत आहे. दर्जेदार कांदा पीक खानदेशात होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Women Farmer Recognition: महिला शेतकऱ्यांना मिळणार अधिकृत ओळख; आत्माचे प्रकल्प संचालक अमोल आगवण यांची माहिती

Pimpalgaon Baswant APMC: पिंपळगाव बाजार समितीत टोमॅटो खरेदीतील दरतफावतीला लगाम

Rain Deficit : नऊ महसूल मंडलांत २१ दिवसांचा पावसाचा खंड

Agricultural Drought : शेतशिवाराला दुष्काळाच्या झळा

Maharashtra Agriculture : परभणी जिल्ह्यात शुक्रवारपासून केवळ ‘एफएफएस’ ॲपद्वारे खत विक्री

SCROLL FOR NEXT