BJP Morcha : भाजपचा ४ नोव्हेंबरला सोलापुरात मोर्चा
Jan Aakrosh Morcha : सोलापूर लोक निवडून देत नसल्याने निराश झालेल्या काँग्रेस नेतृत्वासह विरोधकांकडून लोकशाही व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करून देशात अराजकता माजविण्याचा प्रयत्न होत आहे. या पार्श्वभूमीवर लोकशाही व्यवस्थेवरील विश्वास दृढ करण्यासाठी भारतीय जनता पक्षातर्फे सोलापुरात ४ नोव्हेंबर रोजी ‘लोकशाही वाचवा, अराजकता हटवा’ (लोकतंत्र बचाओ, भीडतंत्र हटाओ) अभियानांतर्गत मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.