Crop Protection : आंब्याला मोहर येण्यासाठी झाडाच्या मुळांना ताण बसणे आवश्यक असते. यासाठी आंबा बागेतील झाडांच्या बुंध्यालगतच्या एक मीटर परिघातील गवत काढून आळ्यातील माती मोकळी करावी.
आंबा बागेतील मोकळ्या जागेमध्ये उथळ नांगरट करावी. बागेची साफसफाई लवकरात लवकर पूर्ण करावी. जेणेकरून बागेतील जमिनीमध्ये असलेले पाण्याचे प्रमाण लवकर कमी होऊन झाडाला ताण बसण्यास मदत होईल.
विशेष सल्ला
आंब्याला मोहर येण्यासाठी झाडाच्या मुळांना ताण बसणे आवश्यक असते. यासाठी आंबा बागेतील झाडांच्या बुंध्यालगतच्या एक मीटर परिघातील गवत काढून आळ्यातील माती मोकळी करावी. आंबा बागेतील मोकळ्या जागेमध्ये उथळ नांगरट करावी. बागेची साफसफाई लवकरात लवकर पूर्ण करावी. जेणेकरून बागेतील जमिनीमध्ये असलेले पाण्याचे प्रमाण लवकर कमी होऊन झाडाला ताण बसण्यास मदत होईल.
वाल/ कुळीथ
पेरणी
अंग ओलीवर विनामशागत वाल/ कडवा वाल पिकाची पेरणी करण्यासाठी भात कापणीनंतर जमीन वाफसा स्थितीत आल्यावर कोणतीही मशागत न करता टोकण पद्धतीने दोन ओळीत ३० बाय १५ सेंमी अंतर ठेवून वालाची पेरणी करावी. पेरणी करतेवेळी बियाण्याशेजारी छिद्र करून त्यात दाणेदार मिश्रखत गुंठ्यास एक किलो या प्रमाणे द्यावे. अशाच पद्धतीने चवळी आणि कुळीथ पिकाची पेरणी जमिनीच्या अंगओलीतावर करणे शक्य आहे.
तसेच जमीन वाफसा आल्यानंतर नांगरणी करावी. नांगरणीच्या वेळेस प्रति गुंठा ५० किलो चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्टखत मिसळून जमीन समपातळीत आणावी. त्यानंतर वाल बियाण्याची टोकण पद्धतीने ३० बाय १५ सेंमी किंवा ३० बाय २० सेंमी किंवा ३० बाय ३० सेंमी अंतरावर पेरणी करावी. पेरणीच्या वेळेस ५४० ग्रॅम युरिया आणि ३ किलो सिंगल सुपर फॉस्फेट प्रति गुंठा प्रमाणे ओळीमध्ये बियाण्याखाली साधारण ५ सेंमी खोलीवर द्यावे. पेरणीनंतर हलके पाणी द्यावे.
दोन्ही पद्धतीने वालाची पेरणी करताना पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास ३ ग्रॅम थायरम किंवा ५ ग्रॅम ट्रायकोडर्मा या प्रमाणे बीजप्रक्रिया करावी. त्यानंतर रायझोबियम या जिवाणू संवर्धकाची २५ ग्रॅम प्रतिकिलो बियाणे प्रमाणे पेरणीपूर्वी १ तास आधी व बुरशीनाशकानंतर प्रक्रिया करून बियाणे सावलीत सुकवावे. रायझोबियमची प्रक्रिया केल्यामुळे मुळावरील गाठीची संख्या वाढून नत्राचे स्थिरीकरण जास्त प्रमाणात होऊन उत्पादनात वाढ होते.
नागली किंवा नाचणी
पक्वता
कापणीस तयार नागली पिकाची कणसे सकाळच्या वेळेस विळ्याने कापून कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी वाळविण्यासाठी पसरवून ठेवावीत. वाळविल्यानंतर त्याची मळणी करून घ्यावी.
खरीप भात
पक्वता ते काढणी अवस्था
तयार झालेल्या भात पिकाची कापणी जमिनीलगत ‘वैभव’ विळ्याने सकाळच्या वेळेस करावी. कापणी केल्यानंतर लगेच झोडणी करावी. जेवढ्या पिकाची झोडणी करणे शक्य आहे, तेवढ्याच पिकाची कापणी करावी.
झोडणी केलेले धान्य सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावे.
उन्हाची उपलब्धता नसल्यास, धान्य वाळविण्यासाठी पर्यायी व्यवस्था करावी. कुठल्याही परिस्थितीत भात पीक कापून शेतामध्ये ठेवू नये.
तयार भाताची कापणी उशिरा केल्यास लोंबीच्या टोकाचे चांगले दाणे शेतात पडतात. भात कांडपाच्या वेळी कणीचे प्रमाण वाढते.
खोडकिडीचा प्रादुर्भाव दिसून येणाऱ्या भात खाचरात भात पिकाच्या काढणीनंतर शेत नांगरून शेतातील धस्कटे काढून नष्ट करावीत. तसेच पिकाची कापणी जमिनीलगत करावी, जेणेकरून किडीचे सुप्तावस्थेतील अळ्या नष्ट होण्यास मदत होईल.
भात पिकाच्या काढणीसाठी मनुष्यबळाचा अभाव असल्यास, यांत्रिकीकरणाचा वापर करता येईल.
चवळी
पेरणी
चवळी पिकाची जमिनीची मशागत करून पेरणी करण्यासाठी जमीन वाफसा स्थितीत आल्यावर मशागतीची कामे करण्यास सुरुवात करावी. नांगरणीच्या वेळेस प्रति गुंठा ५० किलो चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्टखत मिसळून जमीन समपातळीत आणावी. उताराच्या आडव्या दिशेने ४ बाय ३ मी. आकाराचे सपाट वाफे तयार करावे. दोन वाफ्यांमध्ये पाण्याचे पाट ठेवावेत.
बियाण्याची पेरणी ३० बाय १५ सेंमी अंतरावर करावी.
पेरणीच्या वेळेस ६५ ग्रॅम युरिया, ४५० ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट आणि ८० ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश प्रति वाफा खतमात्रा द्यावी.
पेरणीनंतर हलके पाणी द्यावे.
लागवडीसाठी कोकण सदाबहार आणि कोकण सफेद या चवळीच्या वाणांची निवड करावी. एकरी लागवडीसाठी ६ ते ७ किलो बियाणे पुरेसे होते.
पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास, थायरम २ ग्रॅम किंवा ट्रायकोडर्मा ५ ग्रॅम या बुरशीनाशकांची आणि त्यानंतर रायझोबियम आणि स्फुरद विरघळविणाऱ्या जिवाणू संवर्धक प्रत्येकी २५ ग्रॅम प्रतिकिलो बियाणे याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी.
आंबा
आंब्याला मोहर येण्यासाठी झाडाच्या मुळांना ताण बसणे आवश्यक असते. यासाठी बागेतील झाडांच्या बुंध्यालगतच्या एक मीटर परिघातील गवत काढून आळ्यातील माती मोकळी करावी. आंबा बागेतील मोकळ्या जागेमध्ये उथळ अशी नांगरट करावी. बागेची साफसफाई लवकरात लवकर पूर्ण करावी. जेणेकरून बागेतील जमिनीमध्ये असलेले पाण्याचे प्रमाण लवकर कमी होऊन झाडाला ताण बसण्यास मदत होईल.
ढगाळ व दमट वातावरणामुळे आंब्याच्या नवीन येणाऱ्या पालवीवर शेंडे पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून येण्याची शक्यता असते. अशावेळी पालवीचे सतत निरीक्षण करावे. प्रादुर्भाव दिसून आल्यास, कीडग्रस्त शेंडे, काड्या काढून अळीसह नष्ट कराव्यात.
फवारणी ः (प्रतिलिटर पाणी)
लॅम्बडा सायहॅलोथ्रिन (५ टक्के प्रवाही) ०.६ मिलि किंवा
क्विनॉलफॉस (२५ टक्के प्रवाही) २.५ मिलि
आंब्यामध्ये नवीन पालवी आली असल्यास, ढगाळ व आर्द्रता वातावरणामुळे पालवीचे तुडतुडे किडीपासून संरक्षण करावे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली यांच्या शिफारशीत आंबा पालवी व मोहर संरक्षणाच्या सुधारित वेळापत्रकानुसार पहिली फवारणी,
डेल्टामेथ्रिन (२.८ टक्के प्रवाही) ०.९ मिलि प्रति लिटर पाणी या प्रमाणात करावी.
(०२३५८) २८२३८७, ८१४९४६७४०१
(कृषी विद्या विभाग आणि ग्रामीण कृषी मौसम सेवा, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली)
कीडनाशकांच्या शिफारशी लेबल क्लेमप्राप्त किंवा जॉएंट ॲग्रेस्कोप्राप्त आहेत. फवारणीचे प्रमाण हाय व्हॉल्यूम फवारणी पंपासाठीचे आहे. खरेदीवेळी पक्के बिल घ्यावे. बॅन किंवा ़‘रेस्ट्रिक्टेड’ आहे का पाहावे. लेबल क्लेम वाचावेत. पुरेशा ज्ञानाशिवाय रसायने एकमेकांत मिसळू नयेत. रसायनांचा गट तपासावा.
पीएचआय, एमआरएल तपासावेत. पेरणी वा लागवडीपूर्वी संबंधित बियाणांवर कोणती बीजप्रक्रिया केलेली आहे, हे तपासूनच पुढील बीजप्रक्रिया करावी.
मधमाशी, मित्रकीटकांना हानिकारक कीडनाशकांचा वापर टाळावा. पीक फुलोरा अवस्था लक्षात घेऊन कीडनाशकांचा समंजस वापर करावा.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.