Soybean Market  Agrowon
ॲग्रो विशेष

Mahabeej Seed Production : ‘महाबीज’कडून सोयाबीन, उडीद बीजोत्पादन

खरीप हंगाम २०२३ करिता महाबीज कार्यालय नांदेड मार्फत उडीद व सोयाबीन पिकाचे (सीड प्लॉट) आगावू बीजोत्पादन आरक्षण योजना राबविण्यात येत आहे.

Team Agrowon

Nanded News : खरीप हंगाम २०२३ करिता महाबीज कार्यालय नांदेड मार्फत उडीद व सोयाबीन पिकाचे (सीड प्लॉट) आगावू बीजोत्पादन आरक्षण योजना राबविण्यात येत आहे.

सीड प्लॉट नोंदणीसाठी संपर्क साधून जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आगावू बीजोत्पादन आरक्षण(Seed Production Reservation) योजनेमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन ‘महाबीज’चे जिल्हा व्यवस्थापक देवानंद जागंळेकर यांनी केले आहे.

नांदेड जिल्ह्यात खरीप हंगाम २०२३ मध्ये सोयाबीन, तसेच उडदासाठी बीजोत्पादन कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. या बीजोत्पादनासाठी आवश्यक असलेले पायाभूत बियाणे बीजोत्पादकांना महाबीजमार्फत योग्य किमतीत देण्यात येते.

पिकाचे संपूर्ण उत्पन्न महाबीज परत विकत घेते. सीड प्लॉटसाठी पायाभूत उच्च दर्जाचे बियाणे वापरल्यामुळे उत्पन्नात वाढ होते. दर बाजारभावापेक्षा २० ते २५ टक्के जास्त मिळत असल्याने आर्थिक फायदा होतो.

बियाणे उगवणक्षमता व चांगले बियाण्यांचे प्रमाण या गुणवत्ता निकषावर ७५ ते १२५ प्रति क्विंटल वाढीव भाव दिला जातो. महाराष्ट्र शासनाची बियाणे उत्पादन सबसिडीही नवीन वाणांना देण्यात येते त्याचाही फायदा बियाणे उत्पादकांना होत असतो.

एका गावात सर्व पिके मिळून २५ एकर सीड प्लॉट असणे आवश्यक आहे. नोंदणीची अंतिम तारीख १० मेपर्यंत आहे. त्याकरिता स्वसाक्षरित सातबारा, आधार कार्ड, बँक पासबुकची झेरॉक्स प्रती सोबत आणाव्यात.

खरीप हंगामाकरिता आरक्षण केल्यानंतर पायाभूत किंवा मूलभूत बियाण्याच्या एकूण उपलब्धतेनुसार बीजोत्पादन कार्यक्रमाचे आवंटन करण्यात येईल याची सर्वांनी नोंद घ्यावी,

उडीद बियाण्यांचे तसेच सोयाबीन जेएस ३३५ व एमएयूएस १५८ वाणांचा बीजोत्पादन कार्यक्रम घेणाऱ्या शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात येऊन त्याअनुषंगाने आरक्षण घेण्यात येईल याची सर्वांनी नोंद घ्यावी, असे आवाहन महाबीजचे नांदेड जिल्हा व्यवस्थापक देवानंद जागंळेकर यांनी केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Monsoon Rain: तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज; राज्याच्या बहुतांशी भागात पावसाची उघडीप राहण्याची शक्यता

Drip Irrigation Projects : सूक्ष्म सिंचनच्या प्रस्तावांना पूर्वसंमतीची प्रतीक्षा

Solar Energy Project : वार्षिक दहा लाख युनिट वीजनिर्मितीचा सौर ऊर्जा प्रकल्प

Farmers Market in Khandesh : खानदेशात शेतकरी बाजार केव्हा सुरू होणार

Ancient Farming Techniques: शेतीच्या उगमाच्या सिद्धांताला ९२०० वर्षांपूर्वीच्या गुहांचे आव्हान

SCROLL FOR NEXT