Akola Agriculture Business News : अलिकडच्या काळात शेतीत उत्पादन कमी होत असल्याने उत्पादकतेवर त्याचा विपरित परिणाम झाला आहे. शेतीत फायदा नसल्याची शेतकऱ्यांची मानसिकता बनली.
परंतु, शेतीला पूरक जोडधंद्यांची जोड दिल्यास निश्चितपणे चित्र बदलेल व शेती फायद्याची होईल. बीजोत्पादन जोडधंदा (Seed production business) बनवत उत्पादनात वाढ करा, असा सल्ला महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक सचिन कलंत्रे यांनी दिला.
अध्यात्माला सामाजिकतेची जोड देत परमहंस संत पुंडलिक बाबांच्या जन्मोत्सव यात्रा महोत्सवात जनमंच, प्रगती शेतकरी मंडळ, न्यू यंग क्लब फार्मर्स ग्रुप व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या समन्वयातून अरुण बोंडे यांच्या पुढाकाराने आठवे कृषी प्रदर्शन व कृषी तंत्रज्ञान महोत्सव आयोजित करण्यात आला.
याचे उद्घाटक म्हणून कलंत्रे बोलत होते. अध्यक्षस्थानी पुंडलिक महाराज संस्थानचे अध्यक्ष विठ्ठलराव पातोंड होते.
गोपाल तायडे व पंकज कांबे यांनी पाहुण्यांचे स्वागत केल्यानंतर जनमंचचे तालुकाध्यक्ष प्रा. सुधाकर गौरखेडे यांनी प्रास्ताविकातून आयोजनामागील भूमिका मांडली.
प्रयोगशील शेतकरी सुरेश गवई (सिरसो) व सागर मानकर (उमई) यांना दोन हजार रुपये रोख, शाल व सन्मानपत्र देऊन जनमंच शेतकरी प्रेरणा पुरस्कार सचिन कलंत्रे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
बियाणे उत्पादन करून शेती फायद्यात आणता येते, असे स्वानुभव कथन या वेळी सुरेश गवई यांनी केले. पशुपालनाची जोड शेतीला दिल्यास हमखास उत्पन्नात वाढ होते, असा आपला दुग्धोत्पादनाचा अनुभव कथन करून सागर मानकर यांनी उपस्थितांना जोडधंद्याचे महत्त्व पटवून दिले.
सूत्रसंचालन मुख्याध्यापक मुसळे यांनी केले. पंकज कांबे यांनी आभार मानले. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश संघटन सचिव रविकुमार राठी, डीपीसीचे माजी सदस्य कृष्णराव गावंडे, अरुण बोंडे, राजू पाटील वानखडे, श्रीकांत वानखडे यांच्यासह असंख्य शेतकरी उपस्थित होते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.