Soybean Machine Agrowon
ॲग्रो विशेष

Soybean Harvesting : सोयाबीन मळणीचा खर्च निघणे कठीण

Soybean Market Update : खरिपातील हुकुमी पैसे देणाऱ्या सोयाबीनच्या पिकातून शेतकऱ्यांच्या हाती काहीच येत नसल्याने ते आर्थिक अडचणीत आले आहेत.

Team Agrowon

Amravati News : सोयाबीनचे उत्पन्न एकरी दोन ते तीन पोते होत असल्याने मळणीचा खर्चही निघणे कठीण झाले आहे. दसरा-दिवाळीचा सण जवळ आला असून, खरिपातील हुकुमी पैसे देणाऱ्या सोयाबीनच्या पिकातून शेतकऱ्यांच्या हाती काहीच येत नसल्याने ते आर्थिक अडचणीत आले आहेत.

जिल्ह्यात मागील आठ ते दहा वर्षांपासून खरीप ज्वारीची जागा सोयाबीन पिकाने घेतली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक पेरणी सोयाबीनची केली जाते. भातकुली तालुक्यात देखील मोठ्या प्रमाणात सोयाबीनची लागवड करण्यात आली.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सोयाबीनपासून मिळणारे उत्पन्न दसरा, दिवाळी तसेच रब्बी हंगामासाठी भांडवलाच्या दृष्टीने उपयुक्त ठरते. परंतु यंदा आधी पावसाचा खंड आणि त्यानंतर हजारो हेक्टर सोयाबीनवर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने या हंगामात एकरी दोन ते तीन क्विंटल सोयाबीनचा उतारा येत आहे.

परिणामी मशागत, बी-बियाणे, कीटकनाशके, मजूर, काढणी व मळणीचा खर्च पाहता शेतकऱ्यांच्या हाती कमी उत्पन्न पडत आहे. त्यामुळे सोयाबीनपासून नफा तर सोडाच, उलट तोटाच पदरात पडत असल्याचे दिसून येत आहे.

कमी उत्पादन निघाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. मजुरांकडून सोयाबीन कापनीस तीन हजार व मळणी प्रति पोते ३०० रुपये मशीन यंत्र मालकाकडून घेतले जात आहेत. सोयाबीनला साडेचार ते चार हजार रुपये प्रतिक्विंटल दर असल्याने शेतकऱ्यांच्या हातात काहीच शिल्लक राहत नाही.

या वर्षी जून महिना पाऊन न झाल्याने कोरडा गेला. जुलैमध्ये पावसाला सुरुवात झाल्यानंतर पेरणी केली, मात्र पाणी बंद झाले. असंख्य अडचणींचा सामना करीत असतानाच उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट झाली. एकरी दोन ते तीन पोते निघालेले सोयाबीन विकल्यास खर्चदेखील निघत नाही. हरभऱ्यासाठी शेत कसे तयार करायचे, याची चिंता लागली आहे.
- सुबोध खेकडे, युवा शेतकरी, पूर्णानगर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

Agriculture Awards: नांदेडमधील चार शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर

Wildlife Management: जाळी लावून रोखला वन्यप्राण्यांचा उपद्रव

Smart Electricity Meter : वादातही सोलापूर मंडळात ४.१७ लाख स्मार्ट मीटर

SCROLL FOR NEXT