Soybean Sowing Agrowon
ॲग्रो विशेष

Soybean Sowing : पाच लाख २९ हजार हेक्टरवर सोयाबीन पेरणी

Kharif Season : छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड या तीनही जिल्ह्यांत सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत जवळपास ८७.५८ टक्के पेरणी आटोपली आहे.

Team Agrowon

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड या तीनही जिल्ह्यांत सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत जवळपास ८७.५८ टक्के पेरणी आटोपली आहे. यात शेतकऱ्यांनी सोयाबीनची सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ५ लाख २९ हजार ५२२ हेक्टरवर पेरणी, तर कपाशीची ८ लाख ३८ हजार २०८ हेक्टरवर लागवड केली आहे.

छत्रपती संभाजीनगर कृषी विभागातील छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड या तीन जिल्ह्यांसाठी यंदाच्या खरीप हंगामासाठी सर्वसाधारण क्षेत्र २० लाख ९० हजार १९८ हेक्टर प्रस्तावित केले आहे. त्या तुलनेत ४ जुलै अखेरपर्यंत तीनही जिल्ह्यांत १८ लाख ३० हजार ५२९ हेक्टरवर पेरणी आटोपली आहे.

सोयाबीनची सर्वसाधारण ३ लाख ७८ हजार ८२४ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत ५ लाख २९ हजार ५२२ हेक्टर म्हणजे जवळपास १४० टक्के क्षेत्रावर पेरणी केली आहे. कपाशीचे सर्वसाधारण क्षेत्र १० लाख ५९ हजार ३२४ हेक्टर आहे. प्रत्यक्षात ८ लाख ३८ हजार २०८ हेक्टरवर म्हणजे सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत एकूण ७९.१३ टक्के क्षेत्रावर कपाशीची लागवड झाली.

जिल्हानिहाय सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत विचार करता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ८३.८४ टक्के, जालना जिल्ह्यातील ८९.१४ टक्के, तर बीड जिल्ह्यात सर्वाधिक ८९.६० टक्के पेरणी आटोपली आहे. मध्यंतरी पावसाच्या खंडामुळे पेरणीला थोडा लगाम घातला गेला होता.

जिल्हानिहाय सर्वसाधारण व प्रत्यक्ष पेरणी क्षेत्र (हेक्टरमध्ये)

जिल्हा सर्वसाधारण प्रत्यक्ष पेरणी

छत्रपती संभाजीनगर ६८४७१६ ५७४०९१

जालना ६१९६९५ ५५२३७२

बीड ७८५७८६ ७०४०६६

पीकनिहाय सर्वसाधारण व प्रत्यक्ष पेरणी क्षेत्र (हेक्टरमध्ये)

पीक सर्वसाधारण प्रत्यक्ष

खरीप ज्वारी १२,४२६ ७३२

बाजरी ११८११३ ४२०१४

मका २४१६८२ २१४७८१

इतर तृणधान्य २३५९ ९२६

तुर १४२२८३ ११२५६८

मुग ६७,२९६ ३२६६०

उडीद ४७८४९ ४६४८४

इतर कडधान्य २८५५ ६९८

भुईमूग १२३०७ ७४५९

सूर्यफूल २२५ ७१

तीळ २६७६ ४०८६

कारळ ४९३ ४१

इतर गळीत धान्य १४३० २७९

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bhaskar Jadhav In Assembly: शेतकरी आत्महत्या, कृषी योजना आणि खोट्या आश्वासनांवरून जाधवांनी सरकारला धरले धारेवर

Group Farming : गटशेती हा शाश्‍वत शेतीचा प्रभावी पर्याय ठरू शकतो

Parbhani Rainfall : जून महिन्यात सरासरीहून कमी पाऊस

Farmer Aid Cancellation: नैसर्गिक आपत्तीच्या मदतीत कपात, शेतकऱ्यांची फसवणूक; वड्डेटीवारांचा सरकारवर निशाणा

Raj-Udhhav Unity : ठाकरे बंधूंची एकजूट पालिकेतही दिसावी

SCROLL FOR NEXT